Crime News Sangli : प्रेमविरहाचा एक रिल्स तयार करून व्हॉटसअप स्टेटसवर अपलोड केल्यानंतर एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने या रिल्सनंतर त्याने स्वत: ला श्रद्धांजली वाहिली होती. सुशांत तोडके असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सुशांतने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.  वाळवा-खेड रस्त्यावर एका शेतातील गोठ्यात  ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी आष्टा पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे. 


सुशांत हा  एका शेतकऱ्याकडे शेतमजूर होता. ईशान वसंत गावडे या व्यक्तीच्या खोलीत तो भाड्याने राहत होता. सोमवारी सकाळी त्याने गोठ्यात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवर सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास आधी प्रेम विराहाचा एक रिल्स तयार केला. त्यानंतर त्याने स्वतःच्या श्रद्धांजलीचा फोटो मोबाइलला स्टेट्स ठेवला. हा स्टेट्स एका व्यक्तीला उद्देशून असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हॉट्सअॅप स्टेट्सवर स्वतःचा फोटो आणि खाली भावपूर्ण श्रद्धांजली असा मजुकर असणारा स्टेट्स त्याने ठेवला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समोर आले.


सुशांतचे व्हॉट्सअॅप स्टेट्स पाहून त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ प्रयत्न करूनही तो फोन उचलत नव्हता. त्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांनी तातडीने तो भाड्याने राहत असलेल्या घर मालकाला फोन वरून सुशांतचा शोध घेण्यास सांगितले. त्यानंतर घर मालक इशान गावडे यांनी सुशांत ज्या शेतात ज्या खोलीत राहत होता. त्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी त्यांना गोठ्यात सुशांतचा मृतदेह लटकत असल्याचे दिसून आले. सुशांतने व्हॉट्सअॅपवर ठेवलेले स्टेट्स पाहता प्रेमभंगातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: