सांगली: सांगलीच्या खानापूर तालुक्यातील घानवड येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. घानवडचे माजी उपसरपंच बापूराव देवप्पा चव्हाण यांचा गळा चिरून  खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गार्डी नेवरी रस्त्यावर हा थरारक प्रसंग घडल्याने परिसरात खळखळ उडाली आहे. बापूराव देवाप्पा चव्हाण हे घानवड गावचे माजी उपसरपंच आहेत, तसेच त्यांचे विटा येथे सोनार सिद्ध ज्वेलर्स या नावाने ज्वेलरीचे दुकान आहे. त्यांचा निर्घृण खून झाल्याने खळबळ उडाली आहे.


बापूराव देवाप्पा चव्हाण हे आपल्या बुलेट गाडीवरून नेवरी रस्त्यावरील पोल्ट्री शेडकडे निघाले होते. गार्डी गावाच्या लगत असलेल्या रस्त्यावर त्यांचा अज्ञाताने गळा चिरून खून केला. ही घटना रस्त्यावरून जाणाऱ्यांनी पाहिली त्यानंतर याची माहिती विटा पोलिसांना देण्यात आली. तात्काळ या ठिकाणी विभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलीस पथक या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी संबंधित झालेल्या घटनेचा पंचनामा केला व हा खून कोणी केला याबाबत पोलीस तपास घेत आहेत. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बापूराव देवाप्पा चव्हाण ( वय 47) हे घानवड (ता. खानापूर) येथील माजी उपसरपंच आहेत. त्यांचा भरदिवसा धारदार शस्त्राने गळा चिरून खून झाल्याची घटना गार्डी (ता. खानापूर) येथे काल (गुरूवारी) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गळ्यावर वार वर्मी बसल्याने ते जागीच ठार झाले. सदर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. बापूराव देवाप्पा चव्हाण हे पोल्ट्रीसह सराफ व्यवसाय करत होते. काल दुपारी ते घानवड येथून गार्डी - नेवरी रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या गार्डी हद्दीत असणाऱ्या त्यांच्या पोल्ट्री शेडकडे बुलेटवरून निघाले होते. तेव्हा त्यांच्यावरती वार करून त्यांचा खून करण्यात आला. 


कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेच्या दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू


कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेच्या दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरगूडमध्ये दोन चिमुकल्यांचा अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. तर करवीर तालुक्यातील मांडरे गावात दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. मांडरेतील दोन भावांच्या वडिलांचाही पंधरा दिवसांपूर्वी विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. रोहित पांडुरंग पाटील आणि कृष्णा पांडुरंग पाटील असं दोन सख्या भावांची नाव आहेत. पाटील यांच्या घरातीलच प्रदीप पाटील यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.