Samriddhi Highway Accident : अपघातांच्या (Accident) मालिकांमुळे सतत चर्चेत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) आज पुन्हा एक भीषण अपघात झालाय. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर चार जण  गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलल्या जातंय. प्राथमिक माहितीनुसार, कार चालकाचा डोळा लागल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार लगतच्या कढडयाला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा अक्षरक्ष: चुराडा झालाय.


समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Expressway) नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल  317 जवळ आज सकाळच्या सुमारास ही घटना घडलीय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. तर अपघातातील जखमींवर सिंदखेडराजा येथील रुग्णालयात उपचार करण्यासाठी हलविण्यात आले आहे.   


तिघे जागीच जण ठार, चार जण गंभीर


महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा ठरलेल्या समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway) वाहतुकीसाठी सुरू झाल्या पासून कायम चर्चेत राहिला आहे तो त्यावर होणाऱ्या अपघातांमुळे. (Samruddhi Highway Accident) आपघातांची ही मालिका रोखण्यासाठी अनेक प्रयत्न संबंधित विभागाने केले आहेत. मात्र, सातत्याने होणाऱ्या या अपघातांमागे बऱ्याच वेळी वाहन चालक देखील जबाबदार असल्याचे समोर आले आहे.


असाच एक प्रकार आज दुपारच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉर वरील चेनेज 317 जवळ झाला आहे. यात चालकाला झोप आल्याने भरधाव कार साईड बेरिअरला जाऊन धडकली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा अक्षरक्ष: चुराडा झाला आहे. तर कार मधील तीन जण ठार झाले असून इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर सिंदखेडराजा येथील रुग्णालयात उपचार करण्यासाठी हलविण्यात आले आहे.


दोन भरधाव ट्रकची समोरासमोर भीषण धडक, दोन्ही ट्रकच्या कॅबीनचा चुराडा


राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक झालीय. या अपघातात दोन्ही ट्रकच्या कॅबीनचा अक्षरशः चुराडा झाला असून यात दबून दोन्ही चालकासह वाहक असे पाच जण फसल्यानं गंभीर जखमी झालेत. हा भीषण अपघात भंडारा-लाखनी महामार्गावरील गडेगावं इथल्या अशोक लेलँड कंपनी समोर मध्यरात्रीच्या सुमारास घडला. मोनू निसाद (24), केशव पारधी (35), श्रावण साकेत (28), चंद्रकांत साकेत (21), नेहाल ठाकूर (27) असे गंभीर जखमींचे नावं आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या