Ahmednagar News Update : अहमदनगर जिल्ह्यात एक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात सैराट फेम प्रिन्स अर्थात अभिनेता सुरज पवार (Suraj Pawar) याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक देखील करण्यात आलीय. दत्तात्रय क्षिरसागर ( रा. नाशिक ), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे ( दोघेही राहणार संगमनेर ) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. 


मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी पाच लाख रूपयांची संशयितांकडून मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी  नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता सुरज पवार याला देखील अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. 


अटकेतील आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहीतीनुसार, या फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग आहे. या प्रकरणी महेश वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये  संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.  


मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगार तरुणाला फसवणाऱ्या भामट्याला राहुरी पोलिसांनी गजाआड केल्यानांतर यामागे मोठे रॅकेट असल्याचे निष्पन झाले आहे. या प्रकरणात सुरज पवार याचा सहभाग असल्याची कबुली अटकेतील आरोपींनी दिल्याने आता एकच खळबळ उडाली आहे. राहुरीचे पोलीस लवकरच सूरज पवार याला अटक करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिलीय.  


नेमकं काय आहे प्रकरण?


नेवासा तालुक्यातील भेंडा येथील महेश बाळकृष्ण वाघडकर याला काही दिवसांपूर्वी मंत्रालयातून बोलत असलायचं सांगत खोटं नाव सांगितलं. आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या सहायक कक्षाधिकारी म्हणून जागा खाली असून त्या भरायच्या आहेत. तेथे तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. काम होण्यापूर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात ऑर्डर मिळेल त्यावेळी तीन लाख रुपये द्या अस सांगितलं फोनवरून सांगितलं. बेरोजगार असल्यानं वाघडकर यांनी पैसे देण्यास सहमती दर्शविली. ठरल्याप्रमाणे 4 सप्टेंबर रोजी राहुरी बस स्थानकावर दोघांमध्ये तोंडी करार झाला आणि पहिल्या टप्प्यात त्याने आरोपीस दोन लाख रुपये दिले. तर उरलेली तीन लाख रूपयांची रक्कम ही नियुक्तीपत्र आल्यानंतर देण्याचे ठरले होते. दरम्यान दोन दोन दिवसानंतर तुमचे नियुक्तीपत्र हे राहुरी विद्यापीठ येथे घेऊन येऊ असे सांगितले. त्यानुसार 9 सप्टेंबर रोजी या सर्वांची भेट झाली. परंतु, वाघडकर याना संशय आला. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  
 
गुन्हा दाखल करत राहुरी पोलिसांनी चौकशी केली असता, श्रीरंग कुलकर्णी हा कोणी व्यक्ती मंत्रालयात नसून तो व्यक्ती म्हणजे दत्तात्रय आरुण क्षिरसागर (रा. दत्तनगर, मालेगाव बस स्टॅप नाशिक) हा आहे. पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या व तपास सुरू केला असताना त्यात आकाश विष्णु शिंदे (रा. संगमनेर) याचे नाव पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी ओमकार नंदकुमार तरटे (रा. उपासनी गल्ली, ता. संगमनेर) या तरुणाच्या दुकानावर छापा टाकला. तो रबरी शिक्के तयार करण्याचे काम करतो. पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून या आरोपींनी दिलेल्या माहितीनंतर सैराट चित्रपटात ज्याने आर्चीचा भाऊ म्हणजे प्रिंन्स म्हणून काम केले तो प्रिन्स देखील संगमनेरात आला होता. त्याने बनावट शिक्के तयार करणाऱ्याला भेटून आम्हांला कामासाठी हे शिक्के लागता असे आरोपीनी सांगितल्यानंतर राहुरी पोलीस आता लवकरच  सुरज पवारला ताब्यात घेऊन यात रॅकेट आहे का याचा तपास करणार आहेत, अशी माहिती राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली. 


दरम्यान, नोकरीचे आमिष दाखवून कोणाची फसवणूक झाली असेल तर अशा तरुणांनी न घाबरता राहुरी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन राहुरी पोलिसांनी केलंय. 


महत्वाच्या बातम्या


Suraj Pawar : नागराज मंजुळेंचा लाडका, ज्याला प्रत्येक चित्रपटात संधी मिळाली, कोण आहे अटकेची टांगती तलवार असलेला सुरज पवार?


सचिन वाझे अनिल देशमुखांना म्हणायचा 'नंबर 1' तर परमबीर सिंगांना राजा, सीबीआयची मुंबई सत्र न्यायालयात माहिती 


Nagpur : राष्ट्रवादीने अनिल देशमुखांचा राजकीय वारसदार निवडला? सलील देशमुखांची काटोल मतदारसंघात सक्रियता