पुणे : पुण्यातील ड्रग्स पार्टी प्रकरण (Pune Crime News) उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) पोलिसांनाही भोवलं आहे. पुण्यातील पार्टी प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक व्ही बी बोबडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. कर्तव्यात कसून केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील एफसी रोडवरील L3 बार हॉटेल पार्टी प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे.
पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई
पुण्यातील L3 बारमध्ये सुरू असलेल्या पार्टी संदर्भात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. बोबडे यांच्या कार्यक्षेत्रात हा बार होता, मात्र तरीसुद्धा पार्टी सुरू असताना ते त्यांच्या परिक्षेत्रात नव्हते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनी त्यांच्या निलंबनाचे निर्देश जारी केले आहेत.
उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक बोबडे निलंबित
राज्य शुल्क विभागाने निलंबनाचा निर्देश जारी करताना त्यात लिहीलं आहे की, पुण्यातील शिवाजी नगर परिसरातील एफ. सी. रोडवरील हॉटेल रेनबो येथे मद्य प्राशन आणि ड्रग्ज सेवन करत असल्याची बातमी दाखवण्यात आली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी व्यवस्थापक मोहित राजेश शर्मा यांचा जबाब नोंदवून 23 जून रोजी आरोपपत्र दाखल केलं. यामध्ये मद्य आणि अंमली पदार्थ विरोधी नियमाचं उल्लंघन होत असल्याचं समोर आलं.
पोलिस निरीक्षकांची कामगिरी संशयास्पद
संबंधित परिसर राज्य उत्पादन शुल्क पुणे बी विभागाचे पोलिस निरीक्षक व्ही. बी. बोबडे यांच्या क्षेत्रात येत असल्याने त्यांनी तात्काळ तिथे जाऊन कारवाई करणे अपेक्षित होतं. पण, ते वेळेवर हजर झाले नाहीत आणि त्यांनी कारवाई केली नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी बोबडे यांना फोन केला असता, ते मुख्यालयात उपस्थितच नसल्याचं समोर आलं. यापूर्वीसूध्दा त्यांच्या कार्यक्षेत्रात उपअधीक्षकांनी अवैध धंदे उघडकीस आणल्यावर कारवाई करण्याचे त्यांना निर्देश देऊन सुद्धा त्यांनी संबधितांना गुन्हा नोंद न करता सोडून दिले. यावरून त्यांची कामगिरी संशयास्पद असल्याचे आढळल्याने त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं निर्देशात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :