Rohit Sharma : नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. विराट कोहली दुसऱ्याच षटकात तंबूत परतला, पण दुसरीकडे रोहित शर्माने वादळी फलंदाजी केली. रोहित शर्माने डावखुऱ्या मिचेल स्टार्क याच्या चिंधड्या उडवल्या. स्टार्कच्या एकाच षटकात रोहित शर्माने चार षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी फोडून काढली. रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत भारताची धावसंख्या वाढवली. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारताने 4.1 षटकात एक विकेटच्या मोबदल्यात 43 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि ऋषभ पंत मैदानात आहेत. 




रोहित शर्माचा झंझावात, स्टार्कला धूतले - 


मिचेल स्टार्कने आपल्या पहिल्या षटकात विराट कोहलीला बाद करत शानदार सुरुवात केली होती. पण भारतीय कर्णधार रोहित शर्मा मात्र वेगळ्याच लयीत होता. स्टार्क ज्यावेळी त्याचं दुसरं षटक घेऊन आला, त्यावेळी रोहित शर्माने त्याच्या चिंधड्या उडवल्या. रोहित शर्माने स्टार्कचं षटकाराने स्वागत केले. रोहित शर्माने स्टार्कला पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, 2.4 षटकानंतर टीम इंडियाच्या 28 धावा झाल्या होत्या, त्या सर्व धावा एकट्या रोहित शर्माने केल्या होत्या. रोहित शर्माने स्टार्कच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. स्टार्कच्या दुसऱ्या षटकात रोहित शर्माने चार षटकात आणि एक चौकार ठोकत तब्बल 29 धावा वसूल केल्या. रोहित शर्मापुढे मिचेल स्टार्कनं गुडघे टेकले होते. डावखुरा मिचेल स्टार्क रोहित शर्मासमोर फिका पडला. मिचेल स्टार्कनं टी20 करिअरमधील सर्वात महागडे षटक टाकले. 






पॅट कमिन्सचे षटकाराने स्वागत -


पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क आयपीएलमधील सर्वात महागडे गोलंदाज आहेत. स्टार्कसाठी 25 कोटी तर कमिन्ससाठी 20 कोटी खर्च केले गेले होते. या दोन्ही गोलंदाजांची रोहित शर्माने भंबेरी उडवली. रोहित शर्माने आधी मिचेल स्टार्क याला धू धू धुतले. त्यानंतर आलेल्या पॅट कमिन्सच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत इरादे स्पष्ट केले. रोहित शर्माने मारलेला हा षटकार मैदानाबाहेर गेल्याचं दिसले. 






रोहित शर्माची वादळी फलंदाजी - 


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल स्टार्क यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. विराट कोहली शून्यावर तंबूत परतला. पण त्यानंतर रोहित शर्माने वादळी फलंदाजी केली. रोहित शर्माने फक्त 14 चेंडूमध्ये 41 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये पाच षटकार आणि 2 चौकार ठोकले. रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने एक बाद 43 धावांपर्यंत मजल मारली.