Pune : पुण्यातील सारसबागेसमोर (Sarasbaug) एक 70 वर्षीय ज्येष्ठ महिला काही दिवसांपासून भिक मागत होती. सारसबागेतील गणपती मंदिरात दररोज दर्शनासाठी येणाऱ्या एका भाविकाने एक दिवशी या महिलेची आपुलकीने विचारपूस केली. आणि त्यानंतर अवैध सावकारकीचे धक्कादायक वास्तव समोर आले. पुणे महानगरपालिकेत काम करणाऱ्या एका अवैध सावकाराकडून या महिलेने नातिच्या उपचारासाठी 40 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्या बदल्यात तिने या सावकाराला दीड लाख रुपये परत दिले. परंतु तरीही या सावकाराची हाव सुटली नाही आणि त्याने या महिलेचे एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून घेतले. दर महिन्याला येणारी पेन्शन तो स्वतः काढून घेत होता. आणि फक्त दीड ते दोन हजार रुपये प्रति महिना या महिलेला देत होता.  बाकीचे जवळपास दहा हजार रुपये तो स्वतःकडे ठेवत होता.


अखेर पोट भरण्यासाठी या महिलेला सारसबागेसमोर भीक मागण्याची वेळ आली. या कमी पैशात या महिलेचं दैनंदिन खर्च हॉस्पिटलचा खर्च देखील भागत नव्हता. त्यामुळे या महिलेवर भीक मागण्याची वेळ आली होती.खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत तक्रारदार ७० वर्षीय महिला राहते. त्यांना दोन मुली असून पतीचे बऱ्याच वर्षांपूर्वी निधन झालं आहे. त्या महापालिकेतून सफाई कामगार म्हणून निवृत्त झाल्या आहेत. या महिलेने पाच वर्षांपूर्वी नातीच्या उपचारासाठी आरोपी दिलीप विजय वाघमारे  याच्याकडून 40 हजार रूपये कर्ज घेतले घेते. 


दिलीप विजय वाघमारे (वय 52) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 70 वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली आहे.
च्याकडे आणखी काही जणांचे पासबुक सापडले आहेत. आरोपी हा महापालिकेत झाडू खात्यात नोकरीला आहे. आणखीन अशा काही  नागरिकांना १० टक्के व्याजाने पैसे देऊन तो व्याजाची वसुली करत होता. त्याने आणखी कोणाकडून अशा पद्धतीने पैसे येतोय का याचा तपास आता खडक पोलीस स्टेशन करत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Pune: बोलणं सोडून दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला; आरोपी दोन तासांत गजाआड


माता न तू वैरिणी...! एक लाख रुपयांसाठी आईने पोटच्या मुलाला विकले, पुण्यातील घटना


Sangli Crime : सांगली जिल्ह्यात दोन दुर्देवी घटना; 5 जणांचा मृत्यू, जिल्ह्यात हळहळ


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha