KFC And Pizza Hut : काश्मीरसंदर्भात वादग्रस्त ट्वीट केल्यानंतर ह्युंदाई (Hyndai), किया मोटर्स (Kia Motors) पाठोपाठ पिझ्झा हट (Pizza Hut) आणि केएफसी (KFC) या कंपन्यांनीही ट्वीट केलं आहे. यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यामुळे ह्युंदाई, किया, केएफसी या कंपन्यांना माफी मागावी लागली. तर पिझ्झा हटनं मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारत आणि पाकिस्तानात कळीचा मुद्दा राहिलेल्या काश्मीरबाबत आधी ह्युंदाई कंपनीनं वादग्रस्त ट्विट केलं. पाकिस्तानमधून केलेलं ट्विट भारतविरोधी असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटली. त्यानंतर किया मोटर्स, केएफसी आणि पिझ्झा हट या कंपन्यांनीही असंच ट्विट केलं. यानंतर सोशल मीडियात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर या कंपन्यांनी माफीनामा दिला खरा, पण पिझ्झा हटनं मात्र अद्याप तशी प्रतिक्रिया दिलेली नाही.


केएफसीकडूनही काश्मीरबाबत ट्विट
केएफसीच्या पाकिस्तान ट्विटर हँडलवरूनही काश्मीरबद्दल एक ट्वीट देखील करण्यात आले होते, ज्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या. यावर अनेक यूजर्सने #BoycottKFC हॅशटॅगवर नाराजीही व्यक्त करत कंपनीला भारत सोडण्यास सांगितले. त्यानंतर आता केएफसी इंडियाला त्या पोस्टवर ट्विटरच्या माध्यमातून माफी मागावी लागली आहे.


केएफसी इंडियाने माफी मागितली
केएफसी इंडियाने ट्वीट करून माफी मागितली आहे. केएफसीने लिहिले की, ''देशाबाहेरील काही सोशल मीडिया चॅनेलवर पोस्ट केलेल्या पोस्टबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही भारताचा आदर करतो आणि भारतीयांच्या सेवेसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत.'' 


कोणत्या पोस्टवर संतापले नेटकरी?
केएफसी पाकिस्तानने काश्मीर एकता दिनानिमित्त ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. ''काश्मीर एकता दिनी आम्ही त्यांच्या स्वातंत्र्याच्या हक्कासाठी आम्ही पाठिशी उभे आहोत,'' असे या पोस्टमध्ये लिहिले आहे.


सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत
काश्मीरसंदर्भातील वेगवेगळ्या कंपन्यांच्या ट्विटमुळे भारतीय नेटकरी चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी ह्युंदाई, किया मोटर्स, केएफसी आणि पिझ्झा हटवर कारवाईची मागणी केली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha