पुणे : वारकरी संप्रदायाला हदरवणारी घटना पुण्यातील देवाची आळंदीत (Devachi Alandi Pune) घडली आहे. एका महाराजावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानं वारकरी सांप्रदयामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तीन अल्पवयीन मुलांवर नैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप या महाराजावर आहे. दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर (52 वर्षे) असं या नराधम महाराजाचे नाव आहे. 


दासोपंत महाराज मृदुंग वारकरी शिक्षण संस्था चालवतो. साधारण सत्तर विद्यार्थी दासोपंत महाराजांकडे मृदुंग वाद्याचं धडे घेतात. पण दिवाळीनंतर दासोपंत बिथरले, सुरुवातीला एक व्यसनाधीन विद्यार्थ्याला ब्लॅकमेल केलं आणि त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केलं. मग त्यानंतर दासोपंत महाराजांमधील हैवान जागा झाला. तीन विद्यार्थ्यांवर मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करतच राहिले. कोणाला सांगितल्यास बरं वाईट होईल असं त्यानं धमकावले होते. 


विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितलं (Devachi Alandi Pune Crime) 


मात्र एका विध्यार्थ्याला या वेदना असह्य झाल्यानं, त्याने वडिलांच्या कानावर ही बाब टाकली. मग वडिलांनी थेट आळंदी पोलीस स्टेशन गाठलं. सुरुवातीला पोलिसांना ही यावर विश्वास बसेना. त्यामुळं पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी याकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं पीडिताच्या पालकाने गोंधळ घातला. मग वरिष्ठांनी यात लक्ष घातलं. 


हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दासोपंत महाराजांचं बिंग फुटलं. हे पाहून उर्वरित दोन मुलांनीही त्यांच्या कुटुंबाला याबाबत कळवलं. त्यामुळं आत्तापर्यंत तीन अल्पवयीन मुलांवर नराधम दासोपंत महाराजांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. 


वारकरी संप्रदायात खळबळ


याप्रकरणी पॉस्को कलमाखाली आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम महाराजास बेड्या ठोकल्या आहेत. आणखी कुणी पीडित असल्यास त्यांना पुढं येण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय. या घटनेमुळं वारकरी संप्रदायात मात्र एकच खळबळ उडालेली आहे.


लातुरात सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार 


लातूर जिल्ह्यातील वलांडी  या गावातील एका सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे. याच गावातील अल्ताफ महेबूब कुरेशी या युवकांने घराशेजारी राहणाऱ्या सहा वर्षीय मुलीवर काही दिवसापासून लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली. सदरच्या मुलीने आपल्या आईला या अत्याचाराचे माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. अत्याचारग्रस्त मुलीच्या वडिलांचं निधन काही वर्षांपूर्वी झाले आहे. 


ही बातमी वाचा: