Onion News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) चांगले दिवस आले आहेत. कारण कांद्याच्या दारत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांचे सध्या विक्रीसाठी कांदे आहेत, त्यांना मोठा फायदा मिळत आहे. दरम्यान, कांद्याचे दर (Onion Price) जास्त वाढू नये म्हणून सरकार प्रयत्न देखील करत आहे. देशातील अनेक महत्वाच्या शहरात सरकारकडून कमी दरात कांद्याची विक्री सुरु आहे. मुंबईसह (Mumbai), दिल्ली (Delhi), चेन्नई, कोलकाता, पटणा या शहरात सरकारकडून 35 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री सुरु आहे. त्यामुळं त्यामुळं अनेक ठिकाणी कांद्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. 


नाफेडच्या वतीनं देशातील महत्वाच्या शहरात 5 सप्टेंबरपासून कमी दरात म्हणजे 35 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री सुरु आहे. यामुळं ग्राहकांना कमी दरात कांदा उपलब्ध होत आहे. मात्र, याचा परिणाम अनेक ठिकाणी कांद्याच्या दरावर झाला आहे. 


कांद्याच्या दरात कोणत्या शहरात किती घसरण?


कमी दरात कांद्याची विक्री केल्यानं दिल्लीत 60 रुपयावरुन कांद्याचे दर हे 55 रुपयांवर खाली आले आहेत. तर दुसरीकडे मुंबईत 61 रुपयावरुन कांद्याचे दर हे 56 रुपयांवर कमी आले आहेत. तर चेन्नईत कांद्याचे दर 65 रुपयावरुन 58 रुपये किलोवर आले आहेत.


मुंबई 45 ठिकाणी कमी दरात कांद्याची विक्री सुरु


दरम्यान, सध्या दिल्लीत 2 ठिकाणी सरकारच्या वतीन 25 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री सुरु आहे. तर  मुंबई 45 ठिकाणी कमी दरात कांद्याची विक्री सुरु आहे. तसेच चेन्नई 19 ठिकाणी कमी दरात कांद्याची विक्री सुरु आहे. येत्या काही दिवसांत हैदराबाद, बंगळुरू आणि कोलकाता तर या महिन्याच्या अखेरीस सर्व राज्यांच्या राजधानींमध्ये कमी दरात कांद्याची विक्री केली जाणार आहे.


गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या दरात वाढ


गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या दरात वाढ होत आहे. याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळत आहे. मात्र, दुसरीकडे वाढत्या दरामुळं ग्रहाकांच्या खिशाला झळ बसत आहे. त्यामुळं सरकारुनं कमी दरात कांदा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महागाई वाडू नये असा सरकारचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळं देशातील महत्वाच्या शहरात सरकारकडून कमी दरात कांद्याची विक्री सुरु असल्याचं बोललं जात आहे. 


महत्वाच्या बातमी :


कांद्याच्या दरात वाढ होणार, बळीराजाला दिलासा मिळणार! निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर निर्यातील चालना मिळणार