पुणे : पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. त्यात  (Pune Crime news) रोज भाईगिरी सुरुच असल्याचं घडलेल्या घटनांमधून समोर आलं आहे. पुण्यातील अनेक आरोपींना तडीपार करण्यात आलं आहे मात्र तडीपार तरुणांनं शहरात येऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ‘‘मी इथला भाई आहे. कोणाला सोडणार नाही,’’ असे म्हणत कोयत्याचा धाकाने दशहत निर्माण केली. पोलिसांनी कोयता जप्त करून तरुणाला अटक केली.निहाल महमद शेख (वय 25, रा. मोहननगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. 



निहाल महमद शेख याने नोव्हेंबर महिन्यात कोयता हातात घेऊन मोहननगर भागात फिरून रस्त्याने येणाऱ्या - जाणाऱ्या नागरिकांना कोयता दाखवून दहशत निर्माण केली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्तांनी निहाल याला 17 नोव्हेंबर 2023 रोजी दोन वर्षांच्या कालावधीसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलं होतं. मात्र तरीही त्यानंतर त्याने कायदेशीर परवानगी न घेता शहरात आला. तसेच कोयता हातात घेऊन मोहननगर भागात फिरून रस्त्याने येणाऱ्या - जाणाऱ्या नागरिकांना कोयता दाखवून दहशत निर्माण केली. मी इथला भाई आहे, कोणाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. या सगळ्या दहशतीला घाबरुन दुकानाचे शटर ओढून दुकाने बंद केले. या सगळ्या संदर्भातील माहिती मिळताच पोलिसांनी तडीपार असलेल्या निहाल याला पुन्हा एकदा ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे असलेला कोयता जप्त केला.


पुण्यात रोज नवे भाई अन् टोळ्या


पुण्यात मागील सहा महिन्यांपासून कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. त्यांचा हा धुमाकूळ कमी करण्याससाठी पुणे पोलीस प्रयत्नशील आहे. मात्र सध्या बघायला गेलं तर पुण्यात रोज नवी एक टोळी तयार होताना दिसत आहे आणि रोज नवा भाई तयार होताना दिसत आहे. भररस्त्यात मारहाण करणं, गाड्या फोडून दहशत निर्माण करणं, एकमेकांवर क्षृल्लक कारणावरुन हल्ले करणं हे प्रकार सुरुच आहे. भाईगिरीच्या नावाने पुण्यात अनेक परिसरात धुमाकूळ माजवला जात असल्याचं घडत असलेल्या घटनांमधून दिसत आहे. 


विशीतील तरुण गुन्हेगारीत


पुण्यातील गुन्हेगारीतील आरोपींचं वय बघितलं तर विशीतील तरुण आरोपी असल्याचं दिसून येत आहे. कॉलेजमध्ये दादागिरीपासून सुरु झालेली गुन्हेगारी मोठ्या टोळ्यांपर्यंत येऊन पोहचतो. त्यामुळे या तरुणांना योग्य मार्गदर्शन करणं आणि त्यांना गुन्हेगारीपासून लांब ठेवणं हे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Crime News : लय मोठा भाई झालास का? भाईगिरीवरुन वाद वाढला अन् मित्राच्या कानाचा थेट लचकाच तोडला; पुण्यातील घटना