Pune Crime news : मागील काही दिवसांपासून (Pune Crime news ) पुण्यात गुन्हेगारीत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. त्यातच कौटुंबिक कलह (Domestic violence) आणि कौटुंबिक गुन्ह्यांमध्येदेखील वाढ होत आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरजावयाला घरात राहू नको, असं सांगितलं आणि जावयानं आक्रमक होत सासूच्या अंगावर फेकून तिला जबर मारहाण केली. त्यानंतर सासूचं डोकं फरशीवर आपटलं. या सगळ्या मारहाणीत सासूचे दातही पडले. ही घटना पुण्यातील खडकी परिसरात घडली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू सुजाता शिंदे यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी जावई महेंद्र सिद्धनाथ तोरणे याला अटक केली आहे. मारहाणीत सासू जखमी झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  सुजाता शिंदे खडकीतील दारूगोळा कारखान्यात कामाला आहेत. त्यांची मुलगी आणि जावई त्यांच्याकडेच राहतात, त्यांचा जावयाशी काही कारणांमुळे वाद झाला होता. हा वाद टोकाला गेला आणि जावयाने आक्रमक होत सासूच्या अंगावर गरम पाणी फेकलं आणि सासूला जबर मारहाण केली. यात सासूचे दात पडले. 


Pune Crime news : घरातून निघून जा म्हंटल्याचा राग...


मागील अनेक वर्षांपासून सुजाता शिंदे, त्यांची मुलगी आणि जावई तिघेही खडकी परिसरात राहत होते. सासू, मुलगी आणि जावई एकाच घरात राहत असल्यानं घरात सतत काहीना काही कुरबुरी सुरू असायच्या. मात्र अनेकदा सासूनं या सगळ्याकडे लक्ष दिलं नाही. त्यातच वाद वाढत गेले आणि सासूनं थेट जावयाला घराबाहेर निघून जाण्यास सांगितलं. याचा जावयाला राग आला आणि त्यानं थेट गरम पाणी सासूवर ओतलं. 


Pune Crime news : कौटुंबिक वादात वाढ


मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीत सातत्यानं वाढ होत आहे. त्यात अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शुल्लक कारणावरुन घरांमध्ये होणाऱ्या वादांमुळे अनेकदा टोकाचं पाऊल उचलंलं गेल्याच्या घटना पाहिल्या आहेत. अशाच घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. रोज नव्या तक्रारी समोर येत आहेत. 


Pune Crime news : पोलिसांसमोर मोठं आव्हान... 


पुण्यात रोज नव्या घटना समोर येतात. त्यात कधी हल्ले तर, कधी कोयता गॅंगच्या दहशतीमुळे पुणेकर हैराण झाले आहेत. अनेक परिसरात भीतीचं वातावरणदेखील पसरलं आहे. ही सगळी दहशत रोखण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून उपाययोजना राबवल्या जात आहे. मात्र या सगळ्या घटना रोखणं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.