Nitesh Pandey Death : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते नितेश पांडे (Nitesh Pandey) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 51 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. 


हृदयविकाराच्या झटक्याने नितेश पांडे यांचं निधन


'अनुपमा' (Anupamaa) मालिकेतील अभिनेता नितेश पांडे यांचे 23 मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 'अनुपमा' या मालिकेत नितेश पांडे यांनी रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून ते घराघरांत पोहोचले होते. पण आता त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. नितेश पांडे हे शूटिंगसाठी इगतपुरीला गेले होते. दरम्यान 23 मे 2023 रोजी रात्री 1.30 च्या आसपास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. 






नितेश पांडेबद्दल जाणून घ्या... (Who Is Nitesh Pandey)


नितेश पांडे यांचा जन्म 17 जानेवारी 1973 रोजी झाला. त्याने आजवर अनेक मालिका आणि सिनेमांत काम केलं आहे. नितेश पांडे हे मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. 'ओम शांती ओम' या सिनेमात तो बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) झळकला होता. तसेच दिशा परमार आणि नकुल मेहता यांच्या 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यार' या मालिकेतदेखील तो महत्त्वाच्या भूमिकेत होता. 


नितेश पांडे 1998 साली अश्विनी कालेसकरसोबत लग्नबंधनात अडकले. पण 2002 साली त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नितेशने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अर्पिता पांडेसोबत लग्न केलं. 


नितेश पांडे यांच्या सिनेमे आणि मालिकांबद्दल जाणून घ्या... (Nitesh Pandey Movies And Serials)


नितेश पांडेने 1995 साली छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. 'तेजस', 'साया', 'मंजिले अपनी अपनी', 'जुस्तुजू', 'हम लडकिया', 'सुनैना', 'कुछ तो लोग कहेंगे', 'एक रिश्ता साझेदारी का', 'महाराजा की जय हो', 'हीरो-गायब मोड ऑन' आणि 'अनुपमा' या मालिकांमध्ये नितेश पांडेने काम केलं आहे. तर 'बधाई हो', 'मदारी', 'दबंग 2' सारख्या सिनेमांतदेखील तो झळकला आहे. 


संबंधित बातम्या


Vaibhavi Upadhyay Death : 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं कार अपघातात निधन; वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास