Pune Crime : पुण्यात (Pune Crime) किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाने एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केलाय. वडिलांना 'टकल्या' म्हणल्याच्या राग आला आणि अल्पवयीन आरोपीच्या संतापाचा कडेलोट झाला. संतापलेल्या आरोपीने एकाचा दगडाने ठेचून खून केलाय. ही घटना वाघोली परिसरात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडलीये. दारुच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने वडिलांना टकल्या म्हटल्याचा राग आल्याने या अल्पवयीन मुलाने हा खून केलाय. राजू लोहार (वय 46) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
किरकोळ कारणावरून वाद झाला, रागाच्या भरात एकाला संपवलं
अधिकची माहिती अशी की, आरोपी मुलगा आणि खून झालेला तरुण दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. वाघोलीतील दरेकर वस्ती परिसरातील राहिवासी आहेत. आज दुपारच्या वेळेस दोघेही मद्यप्राशन करण्यासाठी बसले होते. दरम्यान, त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरुन वाद सुरु झाला. वडिलांना टकल्या म्हटल्याचा राग आल्याने अल्पवयीन मुलाने राजू लोहार याला मारहाण करण्यास सुरुवात केली. शेजारी असलेल्या दगडाने राजू लोहारने बेदम मारहाण करण्यात आली. यातच राजू लोहारचा मृत्यू झाला.
दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला पोलिसांकडून अटक
दरम्यान खून झाल्याची घटना समोर आल्यानंतर वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृत्यू झालेल्या राजू लोहार यांच्या मुलाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
मागील दोन दिवसात पुणे शहरात खुनाचे चार प्रकार उघडकीस
गेल्या काही दिवसांत पुण्यासह (Pune Crime) आसपासच्या परिसरात अनेक गुन्हेगारी (Pune Crime) कृत्य समोर आली आहेत. गेल्या दोन दिवसांत 4 खुनाचे प्रकार घडले आहेत. काही दिवसांपूर्वी सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोल चोरल्याच्या संशयावरून चार जणांनी 18 वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या काही वर्षात पुण्यासह आसपासचा परिसरात गुन्हेगारीने तोंड वर काढलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या