Pune Crime, चाकण : सध्या राज्यभर महिला अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या असताना चाकण औद्योगिक क्षेत्रातील आंबेठाण गावातील दवणेवस्ती येथे मामाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील आंबेठाण येथे रहात्या घरात आई सोबत झोपलेल्या 4 वर्षीय भाच्चीला झोपत उचलून निर्जनस्थळी नेऊन अत्याचार करण्यात आलाय. सख्ख्या मामानेच अत्याचार केल्याने सर्वांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. 


जीवे मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार 


अधिकची माहिती अशी की, जीवे मारण्याची धमकी देऊन सख्ख्या मामाने भाच्चीवर अत्याचार केलाय. मनिषकुमार सिंग असे अत्याचार करणा-या मामाचे नाव आहे. पीडित मुलीचे कुटुंब बिहार येथील रहिवाशी आहेत. पीडित मुलीचे वडिल एका खासगी कंपनीत कामाला गेले असताना घरात झोपलेल्या 4 वर्षीय मुलीला तिच्या मामाने उठवून घराबाहेर निर्जनस्थळी नेले. जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करुन तिकडेच सोडुन दिलं. या प्रकरणी महाळुंगे पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केलीय.
मात्र या कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.


पीडीत मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल 


डीसीपी शिवाजी पवार म्हणाले, माळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सकाळी एका चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. त्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशन अंमलदार त्याठिकाणी पोहोचले. प्राथमिक चौकशी केल्यानंतर संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित मुलीचा नातेवाईकच आहे. सख्खा मामाचं आरोपी असल्याचं निष्पन्न झालं आहे. पीडीत मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केलेला आहे. आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Pune Porsche case : पुण्यातील धनिकपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून सोडणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाचे दोन सदस्य बडतर्फ