PubG Free Fire Game Crime News  : मुलं मोबाईलच्या आहारी गेल्याची अनेक उदाहरणं समोर येत आहेत. त्यात पब्जी या गेमचं व्यसन खूप वाढत आहे. या खेळाच्या व्यसनाच्या नादात मुलं लाखो रुपये मातीत घालत असल्याचं समोर येत आहे. असाच एक प्रकार चंदीगडमध्ये समोर आला आहे. चंदीगडच्या पीपली वाला शहरातील एका औषधविक्रेत्याला याचा फटका बसलाय. या व्यापाऱ्याच्या अल्पवयीन मुलानं पब्जी, फ्री फायर आणि कार रेसिंग गेमच्या नादात 17 लाख रुपये गमावलेत. ही सर्व रक्कम त्यानं आपल्याच घरातून चोरली. 


यानंतर व्यापाऱ्यानं पोलिसात तक्रार केलीय. पोलिसांनी या प्रकरणात व्यापाऱ्याच्या मुलाच्या तीन अल्पवयीन मुलांना  ताब्यात घेतलं आहे. यात सदर मुलाचा आतेभाऊ आणि मित्राचा देखील समावेश आहे.


औषध व्यापाऱ्याच्या मुलानं घरातून रक्कम चोरुन दोस्तांसोबत जात तीन आयफोन, कपडे, बूट खरेदी केली. एवढंच नाही तर त्यानं विमानाची सैर देखील केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये तीन अल्पवयीन आहेत. अल्पवयीन मुलांना बाल सुधारगृहात पाठवलं आहे तर 27 वर्षीय आरोपीला जेलमध्ये पाठवलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 10 लाख 22 हजार 500 रुपये आणि तीन आयफोन जप्त केले आहेत.  


मुंबईमध्ये देखील घडली होती अशाच प्रकारची घटना 


काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. PUBG खेळण्यासाठी आईच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये खर्च करून 16 वर्षाच्या मुलाने घर सोडलं होतं.  त्याच्या पालकांनी त्याला PUBG खेळण्यासाठी ऑनलाइन व्यवहारातून 10 लाख रुपये खर्च केल्याबद्दल फटकारले होते. म्हणून त्या मुलानं घर सोडलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्याला अंधेरी (पूर्व) येथील महाकाली केव्ह्स परिसरातून ताब्यात घेत त्याच्या पालकांकडे परत पाठवलं होतं. 


इतर महत्वाच्या बातम्या




PUBG खेळण्यासाठी आईच्या बँक खात्यातून 10 लाख खर्च, भीतीने घर सोडलं, अंधेरीतील अल्पवयीन मुलाचं कृत्य