Mumbai : PUBG चा नाद, आईच्या खात्यातवर 10 लाखांचा डल्ला, जोगेश्वरीमधील धक्कादायक घटना : ABP Majha

Continues below advertisement

'पबजी' या ऑनलाइन गेमच्या नादात अल्पवयीन मुलाने आईच्या बँक खात्यातील दहा लाखांवर डल्ला मारल्याची घटना घडलीय. मुंबईत जोगेश्वरी पूर्व इथल्या दुर्गानगर भागात ही घटना घडली. पैसे खात्यातूून काढल्याची बाब आईवडिलांच्या लक्षात येताच त्यांनी मुलाला चांगलाच दम भरला. यामुळे रागाच्या भरात मुलगा घर सोडून गेला. मुलगा घरी परतला नसल्याने आईवडीलांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तपास करत या मुलाचा शोध घेतला असता तो मुलगा अंधेरीतील महाकाली गुंफा इथं फिरताना आढळला. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram