Amravati Crime News अमरावती: अमरावतीच्या राजकमल चौक ते राजापेठ रस्त्यावरील एका स्पा-मसाज सेंटरवर सिटी कोतवाली पोलिसांनी काल धाड टाकत (Crime News) स्पा भागीदारासह चार तरुण आणि तीन तरुणींना ताब्यात घेतले. या स्पा सेंटरवर मसाजच्या नावावर देहविक्रीचा व्यवसाय आणि तरुणीईचे अश्लील चाळे सुरू असल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिसांकडे करण्यात आली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Continues below advertisement


एक वर्षापासून हा स्पा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अनेक संशयास्पद साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा काही अंडरगारमेंट्स बाथरुममध्ये आढळून आले. अमरावती शहराच्या मध्यवस्तीत अशाप्रकारे सुरू असलेल्या अवैध धंद्यांबद्दल काही लोकप्रतिनिधींनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. या प्रकाराची चौकशी सिटी कोतवाली पोलीस करत आहे. 


नेमकं फ्रकरण काय?


राजकमल चौक ते राजापेठ रस्त्यावरील एका स्पावर सिटी कोतवाली पोलिसांनी धाड टाकली. तेथून स्पा भागीदारासह तीन तरूण व तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तेथे मसाजच्या आड देहविक्रीचा व्यवसाय व तरूणाईचे अश्लिल चाळे सुरू असल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिसांकडे करण्यात आली होती. त्या स्पामध्ये मसाजच्या आड अन्य गोरखधंदा सुरू असल्याने तेथील रहिवाशांनी एका माजी नगरसेवकाला त्याबाबत माहिती दिली. त्या नगरसेवकाने त्या स्पामध्ये शिरत तेथील सहमालकासह अन्य जणांना तंबी दिली. त्यानंतर सिटी कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके यांना माहिती दिली. पोलिसांनी तेथून चार तरूण व तीन तरूणींना ताब्यात घेण्यात आले आहे. 


संबंधित बातमी:


Crime News: मुलींसाठी 500, कपलसाठी 800, मुलांसाठी 1000...त्या फ्लॅटमधून येत होते विचित्र आवाज, पोलिसांनी फ्लॅटचं दार उघडलं अन् झाले थक्क