Parbhani Latest Crime News: परभणीमध्ये दोन वर्षांपूर्वी राहत्या घरी सावत्र मुलाने वडिलांचा खून केला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. आरोपी मुलांचं नाव मैनुद्दीन खान असं आहे. याप्रकरणात परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाने मैनुद्दीन खान याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याशिवाय दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षानंतर कोर्टानं याप्रकरणी निकाल सुनावला आहे.
परभणी शहरातील विकास नगर भागात राहणाऱ्या युसूफ पठाण यांचा सावत्र मुलानं खून केला होता. दोन मे 2020 रोजी दुपारी युसूफ पठाण यांचा सावत्र मुलगा मैनुद्दीन खान याने भांडण केलं होतं. युसूफ पठाण घरात बसलेले असताना त्यांच्यासोबत भांडण करून मैनुद्दीन खान याने चाकूने भोसकले आणि आपल्या रूममध्ये निघून गेला होता. त्याशिवाय मैनुद्दीन याने त्याचा सावत्र भाऊ नसिर खान याला ही जवळ येऊ नको, नाही तर तुलाही चाकू मारील अशी धमकी दिली होती. या हल्ल्यामध्ये युसूफ पठाण यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती.
युसूफ पठाण यांच्या मैनुद्दीन खान यांच्यावर चाकूहल्ला केला होता. त्यानंतर जखमी अवस्थेतील यसूफ पठाण यांना नासिर याने जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी युसूफ पठाण यांना मृत घोषित केले. या प्रकरणी नसीर खान याने दिलेल्या फिर्यादीवरून येथील कोतवाली पोलीस ठाण्यात मैनुद्दीन खान यांच्या विरोधात कलम 302,506 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांनी केला. हे प्रकरण न्यायालयात चालल्यांनंतर यात सरकारी पक्षाच्या वतीने एकुण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश ए ए शेख यांनी सर्व साक्ष पुराव्याच्या आधारे आरोपी मैनुद्दीन युसूफ खान पठाण याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याशिवाय दहा हजार रुपयांचा आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षानंतर आरोपीला कोर्टानं शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ऍडव्होकेट ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍडव्होकेट नितीन खळीकर यांनी बाजू मांडली..
इतर महत्वाच्या बातम्या