Kolhapur airport : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या 26  हेक्टरपैकी केवळ 9 हेक्टर जागेचं संपादन झाले असल्याने या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित 17 हेक्टरच्या मालकांनी अद्याप संमतीपत्र दिलेले नाही. विस्तारीकरणाच्या कामांमध्ये अॅप्रन बांधणे, धावपट्टी 1,300 मीटरवरून 1,700 मीटरपर्यंत विस्तार करणे आणि इतर अनेक पायाभूत सुविधा आणि सुरक्षा कामांचा समावेश आहे. हे काम  पूर्ण झाल्यावर मोठ्या आकाराची विमाने देखील विमानतळावर प्रवेश करू शकतील. (Kolhapur airport)


राज्य सरकारने भूसंपादनासाठी 212 कोटी रुपये मंजूर केले होते. ही कोल्हापूर विमानतळासाठी एकाच वेळी दिलेली सर्वात मोठी रक्कम आहे. मुडशिंगी गावातील जमीन मालकांना, ज्यांनी संमती दिली, त्यांना बाजारभावाच्या चार ते पाचपट मोबदला मिळाला आहे. विमानतळासाठी भूसंपादनाची जबाबदारी असलेले उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही पुन्हा एकदा मालकांना संमती देण्याचे आवाहन केले आहे. आम्ही जमीन हस्तांतरणासाठी ना-हरकत जारी करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत दिली आहे. जर ते तसे करण्यात अयशस्वी ठरले तर आम्ही भूसंपादन कायदा, 2013 मधील तरतुदी लागू करू, असे झाल्यास मालकांचे नुकसान होईल. 


मुडशिंगी येथील एकूण क्षेत्र 25.90.49 हे. आर. चौ. मी. पैकी दिनांक 23 डिसेंबर 2022 अखेर एकूण 9.18.22 हे.आर.चौ.मी. जमीन खरेदी केली आहे. मात्र, आता काही सातबारांवर अनेक खातेदारांची नावे असून, त्यापैकी काही खातेदारांची संमती मिळालेली नाही. इतर खातेदारांची संमती प्राप्त न झाल्यामुळे खरेदीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. काही गट नंबरमध्ये संमती मिळूनही न्यायिक वाद असल्याने हे गट खरेदी करता येत नाहीत, अशी स्थिती झाली आहे. 


दरम्यान, काही जमी मालकांनी अधिक नुकसान भरपाईसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे, भूसंपादन लवकरात लवकर होईल या अपेक्षेने विमानतळ प्राधिकरणांनी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करणे आणि केंद्रीय अधिकाऱ्यांकडून परवानग्या मिळवणे यासारख्या बाबी पूर्ण केल्या आहेत. (Kolhapur airport)


Kolhapur airport : कोल्हापूर विमानतळाची भरारी


कोल्हापूर विमानतळाची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. गेल्या चार वर्षांत या विमानतळावरून 9 हजार विमान उड्डाणे झाली असून 4 लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतला आहे. कोल्हापूर-मुंबईनंतर आता कोल्हापूर-बंगळूर विमानसेवाही सुरू होत असल्याने कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या