परभणी: परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ परभणी ते मुंबई लाँग मार्च निघाला होता. दरम्यान हा लाँग मार्च परभणीहून मुंबईच्या दिशेने जात असताना एक अपघाताची घटना घडली आहे. यात मार्च चे नेतृत्व करणारे आशिष वाकोडे यांचा जालना जिल्ह्यातील शेलगाव या ठिकाणी लाँग मार्च आला असता रस्त्याने येणाऱ्या एका भरघाव कार ने आशिष वाकोडे यांना धडक दिल्याची घटना (Parbhani Accident) घडलीय. ही धडक लागल्याने ते जखमी झाल्याचीही माहिती पुढे आली आहे. सध्या त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र सुदैवाने या अपघातात अन्य कुठल्याही  आंदोलकांना गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली नाही.


भरधाव डंपरची ट्रॅक्टरला धडक, एक जण जागीच ठार 3 गंभीर


दरम्यान, अशीच एक अपघाताची (Accident) मोठी घटना जळगाव शहरात घडली आहे. यात जळगाव जिल्हा दूध संघासमोर भरधाव डंपरची ट्रॅक्टरला धडक बसली आहे. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात 2 विद्यार्थी थोडक्यात बचावल्याचे ही सांगण्यात येतंय. दरम्यान या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या जिल्हा दूध संघासमोर भरधाव डंपरने ट्रॅक्टरला मागून धडक दिली.  डंपरच्या धडकेने ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टरवरील एक तरुण ठार असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या अपघातात (Accident) दोन विद्यार्थी  हे थोडक्यात बचावले असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


ट्रेनच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू


गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्याच्या दरेकसा येथून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या टोयागोंदी रेल्वे लाईन गावातील खांब क्रमांक 947/27 जवळ रेल्वे गाडीची धडक बसून एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. मृत बिबट्याचे वय अंदाजे ६ महिने असल्याचे सांगितले आहे. घटनेची माहिती सालेकसा वनविभागाला देण्यात आली. त्यांनतर तपासणी करून शवविच्छेदनासाठी  सालेकसा येथे नेण्यात आले असून त्या बिबट्याचा अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र बिबट्याच्या मृत्यूच्या (Accident) घटनेने वन्यजीव प्रेमीमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या