Chhaava Trailer Controversy : अभिनेता विकी कौशलचा बहुप्रतिक्षित छावा चित्रपट चांगलाच वादात सापडला आहे. छावा चित्रपटातील काही दृश्यांवरुन वाद निर्माण झाला आहे. आगामी छावा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यावरुन वाद पेटला आहे. यावर आता मंत्री उदय सामंत यांनीही भूमिका घेतली आहे. छावा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये, अशी भूमिका मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.


'छावा' चित्रपटावरुन वाद पेटला


उदय सामंत यांनी छावा चित्रपटाबद्दल सरकारची भूमिका मांडतान म्हटलं आहे की, छत्रपती संभाजीराजेंच्या सन्मानाला बाधा झाल्याचं खपवून घेणार नाही. छावा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई नाचतानाचा सीन दाखवण्यात आला आहे. शंभूराजे आणि येसुबाई लेझीम खेळताना दाखवलेल्या या सीनवर शिवप्रेमींनी आक्षेप नोंदवला आहे. हा इतिहासाचं अपमान केल्याचं म्हणत शिवप्रेमींनी या चित्रपटाचा निषेध करत बंदीची मागणी केली होती. यानंतर आता मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत भूमिका मांडली आहे. 


"...त्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करू नका"


मंत्री उदय सामंत यांनी एक्स मीडियावर ट्वीट करत म्हटलं आहे की, 'धर्मरक्षक,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे. महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने या बाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!'


छावा चित्रपटाबाबत उदय सामंत यांचं ट्वीट






 


पाहा वादग्रस्त छावा चित्रपटाचा ट्रेलर






 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Chhaava Trailer Out : विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाला शिवप्रेमींचा विरोध, शंभूराजे अन् येसूबाईंच्या 'या' सीनमुळे वाद पेटला