ठाणे : मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या मोठ्या शहरांमध्ये एटीएम कार्डसची (ATM Card) अदलाबदल करून लाखोंची लूट करणाऱ्या टोळीतल्या दोघांना पंढरपूर शहर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं हे दोन सराईत गुन्हेगार पंढरपूर परिसरात असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पंढरपूर शहरचे उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांच्या पथकानं पंढरपूर मोहोळ रोडवर फिल्मी स्टाईल पाठलाग करून त्या दोन आरोपीना जेरबंद केलं.


सनी उर्फ चिकण्या मुन्ना सिंग, कल्याण आणि श्रीकांत गोडबोले (उल्हासनगर)  हेच ते अट्टल चोरटे असून ATM सेंटर मध्ये बोलण्यात गुंतवून ते कार्ड बदलायचे आणि त्यातील रक्कम काढून पोबारा करायचे . ठाणे , नवी मुंबई , नाशिक , पुण्यासह अनेक ठिकाणी अशा घटना घडल्यावर ठाणे आयुक्तालयातील खंडणी विरोधी पथक यांच्या मागावर होते.  एटीएम सेंटरमध्ये बोलण्यात गुंतवून हे आरोपी कार्डसची अदलाबदल करायचे आणि मग एटीएममधून मोठी रक्कम काढून पोबारा करायचे. 


ठाणे , नवी मुंबई , नाशिक , पुण्यासह अनेक ठिकाणी अशा घटना घडल्यावर ठाणे आयुक्तालयातील खंडणी विरोधी पथक यांच्या मागावर होते . अखेर ठाणे आणि मुंबई परिसरात लूटमार करणारे हे दोन ठकसेन पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर पोपटासारखे बोलू लागले . त्यांनी त्यांच्याकडून विविध बँकांची तब्बल 101  एटीएम  (ATM) कार्ड काढून पोलिसांना दिल्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी सांगितले . दरम्यान या दोन्ही आरोपींना पंढरपूर शहर पोलिसांनी ठाणे आयुक्तालयाच्या ताब्यात दिले असून पुढील तपस ठाणे पोलीस करत आहेत. 


सहा अंकी पिन अधिक सुरक्षित


सुरक्षेच्या दृष्टीने चारपेक्षा सहाअंकी पिन चांगला होता. मात्र, यामुळे एक अडचण निर्माण होऊ लागली की लोक त्यांचा पिन नंबर सतत विसरू लागले. यामुळे 4 अंकी पिन ठेवण्यात आला. मात्र, आता 6 डिजीट पिन कुठेही वापरला जात नाही असे नाही. तर, जगातील अनेक देशांमध्ये आजही 6 डिजीट एटीएम पिन आहे. आपल्या देशातील अनेक बँका आपल्या ग्राहकांना 6 क्रमांकाचा पिन तयार करण्याची सुविधाही देतात. चार अंकी पिन 0000 ते 9999 दरम्यान असतात. याद्वारे 10000 वेगवेगळे पिन नंबर ठेवता येतात, ज्यामध्ये 20% पिन हॅक केले जाऊ शकतात. त्यामुळे 6 अंकी पिन हा 4 अंकी पिनपेक्षा अधिक सुरक्षित मानला जातो. 


ATM चा शोध कोणी लावला?


एटीएम मशीनचा शोध 1969 साली लागला. याचा शोध स्कॉटिश शास्त्रज्ञ जॉन एड्रियन शेफर्ड बॅरॉन यांनी लावला होता. त्यांचा जन्म भारताच्या ईशान्य भागात असलेल्या शिलाँग शहरात झाला होता. जॉन एड्रियन शेफर्ड बॅरॉन यांनी लावलेल्या या शोधामुळे लोकांचा व्यवहार अधिक सोयीचा झाला आहे.