Agniveer Training: प्रचंड टीका, विरोध आणि राजकारणानंतरही हजारो तरुण अग्निपथ योजनेकडे आकर्षित होत असून लष्कराच्या अग्निपथावर चालण्यास सज्ज झालेत.. नाशिकच्या आर्टिलरी स्कुलच्या लष्करी तळावर अग्निविरांचे खडतर प्रशिक्षण सुरु झालय.. अग्निविरांची भरती कशी होते त्यांना काय प्रशिक्षण दिले जाते याची देशभरातील नागरिकांना उत्सुकता आहे. नाशिकच्या तोफखाना केंद्रात दाखल झालेल्या ध्येयवेड्या अग्नीविरांचे सध्या प्रशिक्षण सुरु आहे. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजने अंतर्ग्रत दोन हजार 640 अग्निविरांची पहिली तुकडी दाखल झाली आहे. दोन जानेवारी 2023 ते सहा ऑगस्ट 2023 पर्यंत 31 आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात दहा आठवड्याचे बेसिक तर 21 आठवड्यांचे ऍडव्हान्स ट्रेनींग असणार आहे.. पहाटे साडेपाच पासूनच त्यांच्या शाररिक क्वायातीना सुरवात होते.. हळूहळू प्रशिक्षणचे एक एक आव्हानात्मक टप्पे सुरु होतात.. धावणे, उड्या मारणे, पुलप्स.. रोप क्लाइम्बिंगचा सराव होतो.. यानंतर त्यांना गनर, फायरिंगचे धडे ही दिले जातात.. .
"लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याचं ध्येय उराशी बाळगून हजारो अग्निविर लष्करी तळावर प्रशिक्षण घेत आहेत.. यात त्यांच्या बॊधिक आणि शारीरिक क्षमतेचा हि कस लागतोय.. देशभरात ४६ तर महाराष्ट्रमध्ये ५ ठिकाणी प्रशिक्षण दिले जात आहे. ३१ आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर जिथे जिथे मनुष्यबळाची गरज भासेल तिथे तिथे या जांबाज अग्निविरांची नियुक्ती केली जाणार आहे.. "
इथे आलेल्या अग्निविराची सुरवातीला कागदपत्रांची तपासणी केली जाते. अग्निविरावर कुठलेही गुन्हे नाही कायदेशीर कारवाई झालेली नाही याची खात्री केली जाते. त्यानंतर त्यांच्याकडून चार वर्ष सेवा बजावण्याच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेतली जाते.. एकदा स्वाक्षरी झाली कि हे सर्व अग्निविर लष्कराच्या काटेकोर नियमाचे पालन करण्यासाठी कटिबद्ध होतात.. त्यांना गणवेश, शूज देण्यापासून त्यांचा हेअर कट करण्यापर्यंत सर्व कामे भरती प्रक्रियेच्या वेळीच केली जातात.. प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर अग्निविरांची बौद्धिक चाचणीही घेतली जाते.. त्यात त्यांनी दिलेल्या उत्तरानुसार त्यांचा कल बघितला जातो. आणि २१ आठवड्यांच्या एडव्हान्स ट्रेनिंगसाठी चार वेगवेगळ्या ट्रेडमध्ये त्यांना समाविष्ट केले जाते. . गनर, तांत्रिक सहायक ( टेक्निकल असिटन्ट ), रेडिओ ऑपरेटर , मोटार ड्रॉयव्हर असे ट्रेड आहेत. बेसिक आणि ऍडव्हान्स ट्रेनींग पूर्ण झाल्यानंतर अग्नीवीर खऱ्या अर्थाने लष्करात दाखल होणार आहेत.
देशसेवाचे स्वप्न बघितले होते. म्हणून लष्करात दाखल झालो. फिझिकल, मेडिकल, आणि लेखी अशा तीन परीक्षा देऊन इथपर्यतं आलोय. भविष्यात रशिया युक्रेनसारखे एखादे युध्य झाले तर आपल्याकडे प्रशिक्षित सैनिक वर्ग तयार आहे, त्याचा युद्धात उपयोग होईल. मी तर सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिाय अग्निवीर सचिन भोळे याने दिली आहे. नाशिकमध्ये त्याचं प्रशिक्षण सुरु आहे.
17 ते 21 वर्ष वयोगटातील हे सर्व तरुण आहे. कमीतकमी शिक्षण दहावी असले तरी अनेक पदवीधरही अग्निपथ योजनेच्या मध्यमातून सैन्यत दाखल झाले आहेत. अग्निविरांना सुरवातीचे चार वर्ष ३० हजार प्रति महिना आणि शेवटचे एकवर्ष 40 हजार प्रतिमहिना वेतन दिले जाणार आहे. चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर यातील २५ टक्के तरुणांना सैन्यदलात सहभागी करून घेतले जाणार आहे. केंद्र सरकारच्या निर्यणानुसार आता लष्करात अग्निवीरच्या माध्यमातूनच भरती होत आहे. आधीची भरती आणि ह्या भरतीती फारसा फरक नसला तरीही अग्निविर हे नाव जरी ऐकले तरीही अंगात एका जोश निर्माण त्यामुळेच मार्चमध्ये दुसरी तुकडी येणार असून अग्निविरांची संख्या साडेपाच हजापर्यंत असेल असा दावा लष्करी अधिकारी करत आहेत. केंद्र सरकारने अग्निपथ योजना जाहीर केल्यानंतर देशभरात वादळ उठले होते. सरकरवर टीकेची झोड उठली होती. आंदोलने झालेत राजकारणही झालं; मात्र तरीही हजारोच्या संख्येनं तरुण या योजनेच्या माध्यमातून देशसेवेचे स्वप्न करण्यासाठी जीवाची बाजी लावण्यासाठी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून सज्ज झालेत...