Pandharpur Crime : प्रेमविवाहास नकार देणाऱ्या वडिलांचा मुलानेच (Son killed Father) अल्पवयीन प्रेयसी आणि तिच्या भावाच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूरजवळ घडली . याप्रकरणी पोलिसांनी (Pandharpur Police) दोन अल्पवयीन बहिण-भाऊ आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला आईशी अनैतिक संबंध ठेवल्यामुळेच हे हत्याकांड झाल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. हत्या झालेल्या व्यक्तीच्या मुलाचा अल्पवयीन
दाळे गल्ली इथल्या 50 वर्षीय व्यक्तीची हत्या झाली होती. याप्रकरणी लातूर येथील दोन अल्पवयीन बहिण-भाऊ आणि मृताच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील खडी क्रशरजवळ कालव्याच्या बाजूला एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. डोके आणि चेहरा दगडाने ठेचून ठार करण्यात आलं. त्यानंतर मृतदेह अर्धवट अवस्थेत जाळण्यात आला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मृतदेहाजवळ ग्रामस्थांनी दोन अल्पवयीन भावंडांना थांबवून ठेवलं होतं.
अल्पवयीन भावंडांकडे चौकशी
दरम्यान पोलिसांनी या मृतदेहाबाबत अल्पवयीन भावंडांकडे चौकशी केली. त्या मुलांना विश्वासात घेऊन माहिती विचारली. त्यावेळी त्या मुलांनी आम्ही लातूरचे असून पंढरपूरमध्ये राहतो. आमच्या वडिलांचं निधन झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. मात्र पंढरपुरात घराजवळ राहणारा मयत इसमाचे आणि आमच्या आईचे प्रेमसंबंध जुळले होते. हा इसम आमच्या घरी येऊन आम्हाला त्रास देत होता. त्या रागातून आम्ही त्याची हत्या केली, असं अल्पवयीन भावंडांनी पोलिसांना सांगितलं.
डोळ्यात चटणी पूड फेकली, अंगावर पेट्रोल ओतलं
मयत इसमाची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची माहितीही अल्पवयीन भावंडांनी दिली. मयत इसमाला हत्येपूर्वी मामाच्या घरी जायचे आहे असं सांगून रिक्षातून घटनास्थळी घेऊन आले. मग पायी जाताना त्याच्या डोळ्यात चटणीची पूड टाकून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. त्यानंतर तो पळून जाऊ लागताच पायाला दोरी बांधून, डोक्यात दगड घालून हत्या केली, अशी क्रूर कहाणी भावंडांनी पोलिसांना सांगितलं.
प्रेमप्रकरणातून हत्याकांड
दरम्यान या प्रकरणी पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी या मुलांना विश्वासात घेऊन अधिक तपास केला. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलीचे मयताच्या मुलाशी प्रेमप्रकरण होते. हे दोघेही लग्न करणार होते. परंतु आरोपीच्या वडिलांचा त्याला विरोध होता. त्यामुळेच मयताचा मुलगा, त्याची प्रेयसी आणि तिचा भाऊ अशा तिघांनी मिळून हे हत्याकांड केलं. लातूरहून आलेल्या अल्पवयीन बहिणीने आपल्या भावासह प्रियकराची भेट घेतली. त्यानंतर त्या तिघांनी लग्नाला विरोध करणाऱ्या प्रियकराच्या वडिलांना निर्जनस्थळी नेऊन तिथे क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर तिघेही पसार झाले होते.
याप्रकरणी तालुका पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी तातडीने पसार आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
संबंधित बातमी