Palghar Latest Crime News : बोईसरमध्ये रात्रीत चार दुचाकींची चोरी होण्याची घटना घडली आहे. शहरात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेय.
बोईसर पूर्वेकडील बेटेगाव येथील टाटा हाऊसिंग या सोसायटीमध्ये रहिवाशांनी इमारतीखाली पार्किंग करून ठेवलेल्या चार दुचाकी मंगळवारी मध्यरात्री 2.30 ते तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली. दुचाकी चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या चोरट्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. बोईसर पोलीस या अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.
बेटेगाव येथील टाटा हाऊसिंग या गृह प्रकल्पातील एम-38,एम-26,एम-13 या इमारतीमधील रहिवाशांनी खाली पार्किंग करून ठेवलेल्या होत्या. या चार दुचाकी मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चोरीला गेल्या. अज्ञात चोरट्यांनी मुसळधार पावसाचा फायदा घेत घेतला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चार ते पाच अज्ञात चोरांनी दुचाकीवर डल्ला मारलाय. दुचाकी चोरी करताना तोंडाला रुमाल बांधलेले हे सर्व चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. चार दुचाकींची चोरी केल्यानंतर यापैकी दोन दुचाकी महागाव रस्त्यावरील गौशाळेजवळ रस्त्याच्या बाजूला झाडीत टाकून दिल्याचे बुधवारी सकाळी आढळून आले होते.
चोरीच्या या घटनेप्रकरणी तक्रार केल्यानंतर बोईसर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चोरट्यांचा कसोशीने शोध घेत आहेत. सणासुदीच्या दिवसात बोईसर पोलीस स्टेशन हद्दीत भुरट्या आणि सराईत चोरांनी उच्छाद मांडला आहे. चोरी, घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरीच्या वाढत्या घटनामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालेय. सीसीसीटीव्ही असतानाही चोरट्यांनी शिताफीनं चोरी केल्यामुळे या घटनेची स्थानिकांमध्ये चर्चा सुरु आहे.
रहिवाशांनी सुरक्षेची खबरदारी घ्यावी-पोलिसांचे आवाहन
बोईसर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याच्या पार्श्वभूमीवर बोईसर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. गृहनिर्माण सोसायट्यानी देखील इमारत आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, पथदिवे यांची व्यवस्था केली आहे. अनोळखी माणसांना प्रवेश बंदी आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक त्याचप्रमाणे घर किंवा खोली भाड्याने देताना भाडेकरूची संपूर्ण पोलीस पडताळणी करण्याचे आवाहन बोईसर पोलिसांनी नागरिकांना केले आहे. रहिवाशांनी घाबरुन जाऊ नये, सुरक्षेची खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी म्हटलेय.
आणखी वाचा :
Dhule Crime : गुजरातच्या शकुल कंपनीकडून महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची फसवणूक, 76 कोटी रुपयांचा गंडा