Online Fraud :  सध्या मोबाईल हा लोकांची गरज नाही तर सवयीचा भाग झाला आहे. लहान मुलांपासून ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वजण मोबाईलचा वापर करतात. मोबाईलमधील वेगवेगळ्या अॅप्सचा वापर देखील लोक करतात. अनेकांची कामे ही मोबाईलवर अवलंबून असतात. पण हा मोबाईल वापरताना काही गोष्टींकडे तुम्ही विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण मोबाईल  फ्रॉड (Mobile Fraud) संदर्भात नुकताच एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. 


एका रिपोर्टमध्ये असे स्पष्ट झाले आहे की 10 पैकी एक भारतीय मोबाईल यूजर हा फिशिंग लिंकचा वापर केल्याने ऑनलाइन फ्रॉडला बळी पडतात. अहवालानुसार, भारतासह 90 देशांमध्ये 500,000 डिव्हाइजमध्ये फिशिंग लिंक क्लिक करण्यासंदर्भात अभ्यास करण्यात आला. ज्यामधून हे समोर आले की, फिशिंग लिंकचा अर्थ फक्त संदेश मिळवणे नसून त्यावर क्लिक करणे असा आहे. फिशिंग हे एक प्रकारचे सोशल  इंजीनियरिंग आहे. ज्यामध्ये अटॅकर्स  फ्रॉड मेसेज करतात. त्या मेसेजला यूजरने क्लिक केले तर अटॅकर त्या यूजरच्या फोनमधून पर्सनल डेटा चोरी करतो. 


Smartphone Tips: फोनमधील स्पेस संपली? नको असलेला डेटा असा डिलीट करा


क्लाउड सिक्योरिटी फर्मच्या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे की, Wandera (Jamf Company) च्या मते, फिशिंग लिंकवर क्लिक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, 93 टक्के लोक फिशिंग डोमेन्सला एका सुरक्षित वेबसाइटवर होस्ट केले जाते आणि त्यासाठी पॅडलॉक URL चा वापर केला जातो. सध्या 93 टक्के लोक फिशिंग साइट्सवरून  फ्रॉड करण्यासाठी  HTTPS व्हेरिफिकेशनचा वापर करत आहेत. 2018मध्ये याची संख्या 65 टक्के वाढली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य लोकांना खऱ्या आणि खोट्या वेबसाइटमधील फरक ओळखणे अवघड झाले आहे. त्यामुळे स्मार्टफोनचा वापर सावध राहूनच करावा.


Facebook Messenger : फेसबुक मेसेंजरची 'ही' नवी पद्धत ग्रुप व्हिडीओ कॉल अधिक मजेशीर बनवते


हिंसेसंबंधी पोस्ट, अपशब्द आणि अनधिकृत अकाऊंट्सला रोखण्यात फेसबुक अपयशी! रिपोर्टमधून माहिती