गडचिरोली :  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( CM Eknath Shinde) यांनी नुकतीच नक्षलदृष्ट्या अतिशय संवेदनशील (Naxal Affected Area) आणि अतिदुर्गम गडचिरोलीतील (Gadchiroli) अशा पिपली बुर्गी येथे पोलीस जवान तसेच ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली. तसेच याप्रसंगी भाऊबीज सणाचे औचित्य साधून महिला पोलीस अंमलदार आणि आदिवासी महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण देखील केले. याला 24 तास पूर्ण होत नाही तर तोच गडचिरोली (Gadchiroli) भागात नक्षल्यानी (Naxalites) एक तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. दिनेश पुसू गावडे असे हत्या झालेल्या या 27 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो लाहेरी गावातील (Laheri Village) रहिवासी होता. पोलिसांचा खबऱ्या असल्याचे आरोप करत नक्षलवाद्यांनी 15 नोव्हेंबरला त्याची हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


गडचिरोलीतील भामरागड ( Bhamragad ) तालुक्यातील लाहेरी पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या गोंगवाडा ते पेनगुंडा रोडवरील पेनगुंडा गावाजवळ ही घटना घडली आहे. लाहेरी गावातील रहिवासी असलेला दिनेश गावडे हा बुधवार 15 नव्हेंबर रोजी गावातून कामानिमित्त बाहेर गेला होता. त्या दिवशी तो घरी परतलाच नाही. आज 16 नोव्हेंबर सकाळी त्याचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळी नक्षल्याकडून एक पत्र देखील ठेवण्यात आले आहे. या घटनेचा तपास लाहेरी पोलिस करत आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नक्षलवाद्यांच्या  कारवाईला कधी पायबंद घातला जाईल असा प्रश्न नागरिकांनी उपस्थिती केला आहे.


मुख्यमंत्र्यांनी याच जिल्ह्यात साजरी केली होती भाऊबीज


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांनी नुकतीच नक्षलदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि अतिदुर्गम अश्या गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला होता. यावेळी ते पिपली बुर्गी या भागात पोलीस जवान तसेच ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली होती. तसेच एटापल्ली उपविभागाअंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पिपली बुर्गी पोलिस स्टेशन येथे उभारण्यात आलेल्या नवीन विविध वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या घटनेला 24 तास उलटून जात नाही तर त्याच गडचिरोली जिल्हात ही घटना घडली आहे. 


इतर संबंधित बातमी :