मुंबई : नवी मुंबईमध्ये अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या नायजेरियन टोळीला नवी मुंबई पोलिसांनी जेरबंद केलं आहे. मुंबई, नवी मुंबई आणि इतर परिसरात ही टोळी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सप्लाय करत होती. या टोळीपर्यंत पोहोचणं फार अवघड होतं, कारण अनेकदा या टोळीने पोलिसांवरच हल्ला करून पळ काढला होता. मात्र यावेळी नवी मुंबई पोलिसांनी सहाशे पोलिसांच्या मदतीने विविध पथक तयार करत या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तस्करीमध्ये पकडण्यात आलेले नायजेरियन ड्रग्स पेडलर यांच्यावर कारवाई करून त्यांना त्यांच्या देशात पाठवण्याचे काम नवी मुंबई पोलीस करणार आहेत.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे, मीरा-भाईंदर या परिसरामध्ये लोकल तस्करीवर पोलिसांनी कारवाई करत अमली पदार्थाची विक्री थांबवली. बरेच तस्करी करणारे आरोपी तुरुंगात आहेत. मात्र परदेशी पेडलर्सकडून होणारी विक्री खरेदी ही पोलिसांची डोकेदुखी ठरत होती. म्हणून नवी मुंबई पोलिसांनी आता केलेल्या कारवाईनंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये येणारे ड्रग्सचे प्रमाण कमी होईल असा पोलीस सूत्रांच म्हणणं आहे.
नवी मुंबईत अमली पदार्थ तस्करांवर कारवाई करत पोलिसांनी सुमारे 23 परदेशी नागरिकांना अटक केली असून उर्वरितांना ताब्यात घेतले होता, ड्रग्स जप्त केलेले आहेत. शुक्रवारी झालेल्या कारवाईत वाशी गाव व कोपरखैरने इथून 23 तर खारघर येथून 52 या परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. या कारवाईत एकूण 4.36 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ज्यामध्ये खारघरमधून सुमारे 3.68 कोटी रुपयांची ड्रुग्स आणि वाशी गाव आणि कोपरखैरने येथून 68 लाख रुपयांची ड्रुग्स पोलिसांनी जप्त केले आहे.
पोलिसांनी कशी कारवाई केली---
- नवी मुंबई पोलिसांनी या परदेशी नागरिकांविरुद्ध एनडीपीएस कायदा आणि पासपोर्ट कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
- या कारवाईत पोलिसांनी कोकेन, मेफेड्रोन आणि इतर 4.36 कोटी रुपयांच्या ड्रुग्स जप्त केल्या आहेत.
- शुक्रवारी सुमारे 600 पोलिसांच्या पथकाने वाशीगाव, कोपरखैरणे आणि खारघर सेक्टर 35 परिसरात शोधमोहीम राबवून सुमारे 75 जणांना ताब्यात घेतले होते.
- यापैकी बहुतेक परदेशी नागरिकांना त्यांच्या व्हिसाची मुदत संपल्याने त्यांना देशात परत पटवण्याची साठी प्रक्रिया सुरू करणार आहे असे सांगतील.
- अटक करण्यात आलेल्यांपैकी काही जणांना पोलिसांनी याआधी इतर ठिकाणी अटक केले होते आणि त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आला होते म्हणून त्यांना त्यांचा परत देशात पटवण्यात प्रलंबित होण्य्ची शक्यता नाकारता येत नाही.
- तसेच ज्या महिलांना मुले आहेत त्यांचे काय करायचे ते पोलीस तपासत आहोत.
- त्यांचा अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग तसेच त्यांची राष्ट्रीयत्वे तपासली जात होते.
- पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई पोलीस अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत.
अटक करण्यात आलेल्या 23 जणांना न्यायालयात हजर केले, त्यांना सप्टेंबर 6 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. इतर ताब्यात घेतलेल्या पैकी 31 जणांना पोलिसांनी लिव्ही इंडिया नोटीस देऊन त्यांच्या परदेशत जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र पुढील तपास करत पोलीस यांचे आंतरराष्ट्रीय लिंक तपासण्याचा प्रयत्न करत आहेत.