Nashik Crime News नाशिक : येवला पंचायत समितीचे माजी उपसभापती व शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी रुपचंद भागवत (Rupchand Bhagwat) आणि त्यांचे बंधू विष्णू भागवत (Vishnu Bhagwat) यांचे 4 कोटी 10 लाख रुपयांच्या मागणीसाठी सीबीएस येथून बुधवारी रात्री अपहरण (Kidnapping) झाले होते. अपहरणकर्त्यांनी दोघांकडे पैशांची मागणी करून अहमदनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सोडून पळ काढला होता. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) एकाला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. 


माऊली मल्टिस्टेट को. ऑपरेटिव्ह सोसायटी (Mauli Multistate Co. Operative Society), संकल्प सिद्धी कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी विष्णू भागवतवर चार वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. सध्या जामिनावर जेलच्या बाहेर आलेला भागवत भावासह जिल्हा न्यायालय (Nashik District Court) परिसरात आला असता बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचे अपहरण करण्यात आले. 


अपहरणकर्त्यांकडून चार कोटींची मागणी 


अपहरणकर्त्यांनी 4 कोटींची मागणी करत विष्णू भागवत आणि रुपचंद भागवत यांना नाशिक, वाडीवऱ्हे, त्र्यंबकेश्वर मार्गे फिरवले. त्यानंतर पैशाची तजवीज करण्यासाठी रुपचंदला सोडून दिले. त्याने सरकारवाडा पोलिसात माहिती देताच पोलिसांनी चक्र फिरवली आणि अहमदनगरच्या (Ahmednagar) लोणी जवळून दुसऱ्या भावाची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी वेदांत येवला या संशयिताला ताब्यात आहे. 


सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) रुपचंद रामचंद्र भागवत (39, रा. गवंडगाव, ता. ये वला) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित वेदांत येवला, प्रशांत, संभाजी, सुनील, राकेश सोनार व इतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी अपहरण करण्यासाठी तीन कार वापरल्याचे समोर आले आहे. त्यात एमएच 04 डीएन 9677 या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची एक्सयुव्ही कार व संशयित राकेश सोनार याच्याकडील कार वापरल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 


बांधकाम व्यावसायिकाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका


मागील वर्षी बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण करण्यात आले होते. नाशिक पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली होती. या प्रकरणी पोलिसांनी परराज्यातील सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Rajasthan Crime : सौंदर्याच्या जाळ्यात अडकला, भारतीय लष्कराची गुप्त माहिती ISI ला पाठवल्याचा संशय, तपास यंत्रणांनी घेतलं ताब्यात


Rajan Salvi : राजन साळवी यांच्या अडचणी वाढणार? पत्नी आणि भावाला ACB ची नोटीस, अवैध मालमत्ता प्रकरण