नाशिक : राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु आहे. तर दुसरीकडे नाशिकमधून (Nashik Crime News) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता तर शहरात गुंडगिरीने अक्षरशः कळस गाठला आहे. पंचवटी (Panchavati) परिसरात टवाळखोरांनी थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंचवटी पोलीस ठाणे (Panchavati Police Station) येथे कार्यरत असलेले प्रकाश नेमाने (Prakash Nemane) यांच्यावर सोमवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. प्रकाश नेमाने कर्तव्यावरून घरी जात असताना त्यांनी गावगुंडांना हटकवले. यामुळे गावगुंडांना राग अनावर झाला. रागाच्या भारत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने यांनी दगडाने जबर मारहाण केली.
गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान
या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने गंभीर जखमी झाले आहेत. नेमाने यांच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. ऐन निवडणुकीच्या काळात थेट पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला झाल्याने नाशिक शहरातील गुन्हेगारीची चर्चा आता राज्यभरात सुरु झाली आहे. नाशिकमधील गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हान आता नाशिक पोलिसांसमोर आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या