Nashik Crime News नाशिक : काही महिन्यांपूर्वी पंचवटीतील (Panchavati) फुलेनगर येथे दोन गटांत झालेल्या गोळीबार आणि दंगलीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईतास क्राईम युनिट एकने पिस्तूल (Pistol) विक्री करण्यासाठी आला असता अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन दंगलीच्या याच गुन्ह्यात फरार असलेल्या त्याच्या भावासह अन्य एकासही जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट एकचे हवालदार प्रवीण वाघमारे यांना रेकॉर्डवरील संशयित सुमीत दयानंद महाले (Sumit Mahale) (21, रा. मुंजाबाबा गल्ली, फुलेनगर, पंचवटी) हा फुलेनगरातील फिल्ट्रेशन प्लॅन्टच्या पाण्याच्या टाकीखाली येथे गावठी कट्टा व जिवंत काडतुसे घेऊन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.


गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे जप्त


त्यांनी ही माहिती वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे (Anil Shinde) यांना कळविली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला पकडत एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे व रोख एक हजार रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला. महाले आणि मित्रांवर यापूर्वी दगडफेक, तोडफोडीचा गुन्हा दाखल असून तो या गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे होता. 


सापळा रचून आणखी दोघांना अटक


दंगलीनंतर सुमीत आणि त्याचा भाऊ प्रेम दयानंद महाले आणि मित्र हेमंत उर्फ सोनू थोडीराम मोरे (18, रा. मुंजाबाबा गल्ली, फुलेनगर) हे पसार होते. त्यांचा पंचवटी पोलिसांकडून (Police) शोध सुरु असतानाच प्रेम आणि हेमंत हे पेठाफाटा परिसरात आल्याची माहिती प्रविण वाघमारे यांना कळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून दोघांना पकडले. 


मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यात दोघांना अटक


मुंबईनाका पोलिसात दाखल असलेल्या मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील दोघा दुचाकीस्वार संशयितांना युनिट एकने पकडले. हवालदार महेश साळुंके यांना नाशिकरोडच्या उड्डाणपुलाखाली दोघे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. सापळा रचून कारवाई केली असता संशयित अजय राजेंद्र गरूड (25, रा. एचडीएफसी एटीएमजवळ, माळेगाव एमआयडीसी, ता. सिन्नर) आणि विक्रम त्र्यंबक लहाने (23, रा. सोनगिरी, ता. सिन्नर) यांना ताब्यात घेतले. त्यांनी मोबाईल हिसकावून नेल्याच्या गुन्ह्याची कबुली देत पळविलेला मोबाईल पोलिसांना दिला. या कारवाईत केटीएम ड्युक बाईक व मोबाईल असा सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. 


इतर महत्वाच्या बातम्या


Bhusawal News : बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त, ४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकास अटक


'ती'ला रस्त्यातच जाणवल्या असह्य प्रसूती कळा, जागरूक नागरिक धावले मदतीसाठी, रस्त्यातच बाळाला जन्म देण्याची वेळ