Nashik Nandgaon News नांदगाव : ऊसतोड मजूर असलेली महिला आपल्या सासू-सासऱ्यांसोबत कारखान्यावरून दुचाकीवर घरी परतताना शहरातील जुन्या रेल्वे फाटकाजवळ तिला असह्य अशा प्रसूती वेदना जाणवू लागल्या. जागरूक नागरिक व काही महिला पुढे आल्या आणि तिथेच कापड आडवी धरून तिची सुखरूप प्रसूती (Delivery) करण्यात आली. एका सुंदर व गोंडस अशा मुलीला तिने जन्म दिला. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी राम शिंदे (Ram Shinde) यांनी तिची नाळ बाजूला करत पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात (Hospital) तिला भरती केले.
गरोदरपणातील महिन्याचा संपला होता काळ
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगल प्रवीण चव्हाण (Mangal Pravin Chavhan) (रा. घोडेगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव) ही महिला आपल्या कुटुंबीयांसह नगर जिल्ह्यातील कारखान्यावर ऊसतोडीसाठी गेलेली होती. शिक्षणाचा अभाव व गरिबी नशिबी असल्याने पोटातील बाळाची व स्वतःच्या प्रकृतीची भ्रांत या महिलेला होती. केवळ कष्ट करून उदरनिर्वाह साधायचा हेच त्यांचे लक्ष. त्यामुळे गरोदरपणातील महिन्याचा काळ संपला हे त्यांच्या लक्षातच आले नाही. मात्र प्रसूती त्रास जाणवू लागल्याने आपल्या सासू सासऱ्यांसमवेत मंगल चव्हाण ही महिला आपल्या गावी जाण्यासाठी नगर येथील कारखान्यावरून निघालेली होती.
रस्त्यावरच झाली प्रसूती
सायंकाळी नांदगाव शहरातील जुन्या रेल्वे फाटका जवळील त्रिमूर्ती फरसाण व हरिओम पान स्टॉल येते तिला प्रसूती कळा जाणवू लागल्या. जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयापर्यंतही ती पोहोचू शकत नव्हती..त्यामुळे तिच्या ह्या वेदना व अवकळा बघून तेथून पायी चालणाऱ्या महिलांनी साडी आडवी धरत क्षणाचाही विलंब न करता प्रसूती प्रक्रिया सुरू केली.
मुलीला दिला जन्म
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सुनील सोर, जुबेर शेख, रिक्षाचालक रवी लोखंडे व एका तृतीयपंथीने इतर मदतीचे सोपस्कार पार पडले अन् त्या महिलेने एका सुंदर अशा मुलीला रस्त्यावरच जन्म दिला. तोपर्यंत ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी असलेला राम शिंदे तिथे पोहोचला अन् अलगद बाळाची नाळ दूर करून दोन जीव मोकळे केले. तातडीने त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आता आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या