Nashik Crime News: नाशिकच्या गंधर्व नगरीमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. हा घटनेमुळे संपूर्ण  नाशिक शहरात एकच खळबळ उडाली असून  सर्वस्थरातून या घटनेबाबत रोष व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच नाशिकचे उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल जाहले असून या प्रकारणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.  


इमारतीच्या 6व्या मजल्यावरून फेकून देत हत्या


पुढे आलेल्या माहितीनुसार अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून आरोपीनं 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलाला फेकून दिलं. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. नव्यानं बांधकाम सुरू असलेल्या बांधकाम साईडवर ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. तर हे कृत्य करणाऱ्या आरोपीच्या शोधासाठी नाशिक पोलिसांचे दोन ते तीन पथक रवाना झाले असून आरोपीचा शोध घेतला जातोय. मात्र गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत हत्या केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


मराठी महिलेचा परप्रांतीय कर्मचाऱ्याकडून फोटो काढून विनयभंग


मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत ओशिवरा भागात इन्फिनिटी मॉल मध्ये असलेल्या रिलायन्स फ्रेश सिग्नेचर या कंपनीमध्ये काम करणाऱ्या मराठी महिला कर्मचाऱ्याची परप्रांतीय कर्मचाऱ्याकडून फोटो काढून विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी महिला कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याचा मोबाईल मधून फोटो डिलीट करत समज देऊन सोडून दिलंय.


महिलांनी पोलिसाकडे तक्रार केल्याचा राग धरून रिलायन्स फ्रेश सिग्नेचर कंपनीने महिलेला कामातून काढून टाकले. तर पीडित महिलेने मनसेकडे मदत मागितल्यानंतर मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई आपल्या सहकार्यांसोबत मॉलमध्ये जाऊन रिलायन्स फ्रेश कंपनीला जाब विचारत विनयभंग करणारा आकाश शर्मा या परप्रांतीय कर्मचाऱ्याला मनसे स्टाईल मध्ये चोप दिला. त्यासोबत आरोपी कर्मचाऱ्याला महिलेची माफी मागायला लावली. सोबत त्या महिलेला पुन्हा त्या ठिकाणी कामावर ठेवायला लावले आणि आरोपी मुलाला कामातून कंपनीकडून काढण्यास सांगितलंय. तर मराठी महिलेला मनसेकडून न्याय मिळून दिल्यामुळे महिलेने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे आभार मानले आहे.


हे ही वाचा