Nashik Crime News : पोलीस कर्मचाऱ्याने पत्नी, सासू आणि सासऱ्यावर चाकू हल्ला केला आहे.  या हल्ल्यात सासऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी आणि सासू गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दोडी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.  सूरज उगलमुगले असे हल्ला करणाऱ्या संशयित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. 


जुगार आणि सट्टा खेळण्यासाठी वारंवार सासऱ्यांकडे पैशाची मागणी हा पोलीस कर्मचारी करत होता. सासऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे  या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. यानंतर संशयित आरोपी सूरज उगलमुगले फरार झाला आहे. 


संशयित आरोपी सूरज हा जुगार आणि सट्टा खेळण्यासाठी वारंवार सासऱ्यांकडे पैशाची मागणी करत होता. त्यामुळे यापूर्वी त्याच्या पत्नीने शहर हद्दीतील उपनगर पोलीस ठाण्यात सुरजविरोधात तक्रार दिली होती. परंतु, पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे.


दरम्यान, शुक्रवारी रात्री सिन्नर तालुक्याच्या दोडी गावात संशयित आरोपी सूरज नेहमीप्रमाणे  सासऱ्यांकडे पैशांची मागणी करण्यास गेला. परंतु, सासरे निवृत्ती सांगळे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. या वादातून सूरज याने सारसे, पत्नी आणि सासूवर चाकूने वार केले. यात पत्ती आणि सासू गंभीर जखमी झाल्या तर सासरे निवृत्ती सांगळे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली असून संशयित आरोपी सुरज उगलमुगले फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्वाच्या बातम्या