Nashik Crime News : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता पेठरोडवरील (Peth Road) दत्तनगर परिसरातील कॅनॉलच्या पलीकडे असलेल्या हरि ओमनगरमध्ये (Hari Om Nagar) भाजपचे माजी नगरसेवक उत्तमराव उगले (Uttamrao Ugale) यांच्या उगले सदनच्या आवारात उभ्या असलेल्या पाच मोटारसायकलींसह एका रिक्षाची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करीत मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे गुन्हेगारी रोखणे नाशिक पोलिसांपुढे (Nashik Police) मोठे आव्हान आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, पंचवटीमधील (Panchavati) पेठ रोड भागात कॅनॉलच्या पलीकडे दत्तनगरलगतच हरिओमनगर परिसरात माजी नगरसेवक उत्तमराव उगले राहतात. त्यांच्या निवासस्थानाच्या जवळच काही भाडेकरू राहत असून, ते सर्व जण व्यवसाय व नोकरीनिमित्त कामावर जातात. रात्रीच्या सुमारास घराच्या आवारात भाडेकरूंची एक रिक्षा व चार मोटारसायकली उभ्या होत्या. उत्तमराव उगले यांची शाईन कंपनीची एमएच 15 जीई 5220 या क्रमांकाची मोटारसायकल उभी होती.


समाजकंटकांकडून गाड्यांची तोडफोड 


काल लोकसभा निवडणुकीच्या मतदानानिमित्त उत्तमराव उगले हे दिवसभर बाहेर व्यस्त होते. रात्री घरी परत आल्यानंतर सर्व जण झोपी गेलेले होते. मात्र पहाटेच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून पेठ रोड मार्गे सात-आठ समाजकंटक हातात दांडके घेऊन आले. वाहनातून उतरून त्यांनी रात्रीच्या अंधारात उगले सदनाच्या आवारात उभ्या असलेल्या मनोज चंदनशिव, सागर चंदनशिव आणि मोरे यांच्या चार मोटारसायकलींची, तसेच रिक्षांची तोडफोड केली. तसेच जाताना शिवीगाळ करून पुन्हा वाहनातून उतरत उगले यांच्या दारासमोरच उभ्या असलेल्या त्यांच्या शाईन मोटारसायकलीचीही तोडफोड केली.


पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


त्याचवेळी नजीकच्या घरातून एक वृद्ध महिला व त्यांचा मुलगा जागा झाला. त्यांनी समाजकंटक आल्याने आरडाओरडा केला. मात्र अंधाराचा फायदा घेत ते सर्व समाजकंटक शिवीगाळ करीत वाहनात बसून पुढील मार्गाने फरार झाले. त्यानंतर सकाळी ही घटना कळल्यावर उत्तमराव उगले यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी तातडीने गुन्हेगारांना अटक करावी - उत्तमराव उगले


दरम्यान, नजीकच्या झोपडपट्टीतील काही समाजकंटकांच्या टोळक्याने या वाहनांची तोडफोड केल्याचा संशय असून, त्याला सध्याच्या राजकीय वातावरणाचा तथा निवडणुकीचा रंग देण्याचा डाव यातून दिसून येतो. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करून गुन्हेगारांना अटक करावी, अशी आमची मागणी आहे. या घटनेत नुकसान झालेल्या मोटारसायकली व रिक्षाचे मालक हे गोरगरीब घरांतील असून, पोटापाण्यासाठी ते छोटे छोटे व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे, असे उत्तमराव उगले यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा 


काल फोन, आज ॲक्शन मोड, देवेंद्र फडणवीस अचानक थेट पुणे पोलीस आयुक्तालयात, घडामोडींना वेग!