नांदेड : शहरातील कॅनल रोडवर असलेल्या रेड ओक स्पा टू सेंटरवर पोलिसांनी (Police) छापा टाकला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली येथे अश्लील प्रकार सुरू असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यावरून छापा टाकला असता असता स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा नांदेड (Nanded) दक्षिण युवासेना जिल्हाध्यक्ष अमोद साबळे हा पदाधिकारी स्पा सेंटरचा मालक होता. स्पा सेंटरच्या नावाखाली शिवसनेचा पदाधिकारी कुंटणखाना चालवायचा, अशी माहिती समोर आल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे.
शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या नागसेन गायकवाड, संतोष इंगळे, रोहन गायकवाड यांना भाग्यनगर पोलिसांनी अटक केली असून स्पा सेंटरचा मालक सेनेचा पदाधिकारी अमोदसिंग साबळे, मॅनेजर मनोज जांगिड हे दोघे सध्या फरार आहेत. स्पा सेंटरमधून पोलिसांनी चार महिलांची सुटका देखील केली आहे. तसेच, 16 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत भाग्यनगर पोलिसांनी दोन आरोपीचा शोध सुरू केला असून पुढील अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांकडून अधिक तपास सुरू
भाग्यनगर 02 ऑगस्ट रोजी ई स्क्वेअर जवळील कॅनॉल रोड नांदेड येथे,आरोपी अमोदसिंग साबळे, (वय 27वर्षे), पंकज मनोज जांगिड, (वय 27 वर्षे), नागसेन अनिल गायकवाड, (20 वर्षे), संतोष सुर्यकांत इंगळे, (वय 22 वर्षे), रोहन मिलिंद गायकवाड,(वय 20 वर्षे), नांदेड यांनी संगनमत करून रेड ओके स्पा-2 कॅनॉल रोड नांदेड येथे चार महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत केले. याप्रकरणी, पोउपनि नरेश केशव वाडीवाले यांच्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन भाग्यनगर गुरनं 445/2025 कलम 3,4,5 (1), (ड) अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, तपास पोनि/संतोष तांबे हे करत आहेत.
हेही वाचा
झेडपी, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत VVPAT मशिन नसणार; निवडणूक आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं