Nanded News Update : नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना घडली आहे. किनवट येथील शरयू हॉस्पिटलचा डॉक्टर विकास सुंकलवार याने त्याच्या खासगी रुग्णालयात कामासाठी असलेल्या 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. डॉक्टराच्या अत्याचारात पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली.  6 मे 2022 रोजी  नराधम डॉक्टरने पीडितेचा गर्भपात देखील केला आहे.  


पीडिता नोव्हेंबर 2019 पासून मार्च 2022 पर्यंत विकास सुंकलवार याच्या शरयू हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार म्हणून कामास होती. तिच्यासोबत सलगी करत आणि तिला वेगवेगळी आमिषे दाखवत डॉ. सुंकलवार याने तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. सततच्या प्रकाराला कंटाळून आणि हा प्रकार कोणाला सांगितला तर ठार मारून टाकीन अशी धमकी दिल्यामुळे पीडितेने तेथील काम बंद केले.  त्यानंतर पोट दुखत असल्यामुळे पीडिता डॉक्टरकडे गेली. डॉक्टरच्या अत्याच्यारामुळे पीडिता गर्भवती राहिल्याचे तपासणीतून उघड झाले. परंतु, चाचणीपूर्वीच तिचा गर्भपात झाल्याचे समोर आले. त्यामुळे पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी संशयित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला. 


दरम्यान, पीडित मुलीने याबाबत तक्रार केल्यानंतर किनवट पोलीस ठाण्यात संशयित डॉक्टरविरोधात पोक्सो अंतर्गत  गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारानंतर संबंधित डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. संशयित डॉक्टरवर कडक करवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. नागरिकांतून संशयित डॉक्टरविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 


महत्वाच्या बातम्या


Beed : माझ्या बायकोच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी खून करत राहणार; पोलिसांना आव्हान देत केला खून


Nashik : नाशिकमध्ये जातपंचायत आणि ग्रामपंचायतीचा अजब फतवा! आंतरजातीय विवाह केल्याने विवाहितेचे शासकीय योजनांचे लाभ नाकारले!


धक्कादायक! जेवण दिले नाही म्हणून आईचा दगड आणि लोखंडी फुंकणीने मारून खून, कवठेमहांकाळ तालुक्यातील घटना