Gold Rate : सोन्याची (Gold) खरेदी करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण झाली आहे. काल देखील सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होते. त्यामुळं सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठी संधी मिळाली आहे. आज सोन्याच्या दरात 400 रुपयांची घसरण झालीय. सोन्याचा भाव हा 73 हजार रुपयांच्या खाली आला आहे. याउलट परदेशी बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. 


राजधानी दिल्ली सोन्याच्या दरात घट (Delhi Gold Rate)


मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात तब्बल 400 रुपयांची घसरण झालीय. त्यामुळे सोन्याचा भाव 73 हजार रुपयांच्या खाली आलाय. एका बाजूला परदेशी बाजारात सोन्याचे दर वाढत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. देशाची राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर हा 400 रुपयांनी तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 410 रुपयांनी कमी झाला आहे. चेन्नई, पुणे, मुंबई, केरळ आणि अहमदाबादमध्येही दरात घसरण झालीय. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,970 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची घट झाली आहे. त्यानंतर सोने हे 66,900 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आले आहे. गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं सोनं खरेदीची मोठी संधी आहे. जाणून घेऊयात कोणत्या शहरात सोन्याला किती दर याबाबतची माहिती.


कोणत्या शहरात सोन्याला किती दर?


चेन्नईत 22 कॅरेट सोन्याला  66,900 तर 24 कॅरेट सोन्याला   72980 रुपयांचा दर आहे. 


मुंबईत 22 कॅरेट सोन्याला  66,750 तर 24 कॅरेट सोन्याला   72,820 रुपयांचा दर आहे. 


दिल्ली 22 कॅरेट सोन्याला  66,900 तर 24 कॅरेट सोन्याला   72,970 रुपयांचा दर आहे. 


कोलकाता 22 कॅरेट सोन्याला  66,750 तर 24 कॅरेट सोन्याला   72820 रुपयांचा दर आहे. 


बंगळुरु 22 कॅरेट सोन्याला  66,750 तर 24 कॅरेट सोन्याला   72,820 रुपयांचा दर आहे. 


हैदराबाद 22 कॅरेट सोन्याला  66,750 तर 24 कॅरेट सोन्याला   72,820 रुपयांचा दर आहे. 


पुणे 22 कॅरेट सोन्याला  66,750 तर 24 कॅरेट सोन्याला   72,820 रुपयांचा दर आहे. 


दरम्यान, एका बाजूला देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीचे दर कमी होत असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्या चांदीचे दर वाढत आहेत.


महत्वाच्या बातम्या: 


सोने खरेदीची सुवर्णसंधी! दरात झाली मोठी घसरण, जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?