नांदेड : मुदखेड तालुक्यात रोहिपिंपळगाव येथे रविवारी सायंकाळीपासून बेपत्ता असलेल्या एका सहा वर्षीय चिमुकलीचा अज्ञातांनी गावातून अपहरण करून हत्या केल्याचं समोर आलं आहं. ही हत्या केल्यानंतर मृतदेह आठ ते दहा किलोमीटर दूर असलेल्या  मुदखेड-उमरी रस्त्याच्या काटेरी झुडपात फेकून दिला. या घटनेमुळे नांदेड (Nanded Crime) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


हत्या करण्यात आलेल्या मुलीचे आई-वडील मोलमजुरी करतात. रविवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास ती आपल्या मित्रासह शाळेच्या मैदानावर खेळत होती. उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही. शेवटी नातेवाईकांनी पोलीसात तक्रार दिली.


सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मुदखेड शहरापासून काही अंतरावरील रस्त्याच्या एका झुडपात त्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळापासून काही अंतरावर शाळा आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मुदखेड पोलिसांना देण्यात आली. 


अत्याचार करून हत्या झाल्याचा संशय, पोलिसांचा तपास सुरू


पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदेडला पाठविण्यात आला. आरोपीला लवकरात लवकर अटक करून फाशी द्यावी अशी मागणी भाजपचे प्रणिता चिखलीकर आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वत्सला पुयड यांनी केली आहे. या मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याचे प्रणिता चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.


हिंगोली हत्याकांडातील आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी


हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस वाणी गावामध्ये तिहेरी हत्याकांड घडले होते. स्वतःच्याच मुलाने आई वडील आणि भावाला ठार मारून अपघात केल्याचा बनाव केला होता. या प्रकरणी आरोपी महेंद्र जाधव याला आज बासंबा पोलिसांनी हिंगोलीच्या न्यायालयामध्ये हजर केले असता हिंगोली कोर्टाने त्याला पुढील चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. 


दृश्यम चित्रपट पाच वेळा पाहून आणि क्राईम पेट्रोलचे अनेक एपिसोड्स पाहून मुलाने त्याच्या आई -वडिलांची आणि भावाची हत्या केली होती. चहातून विष देऊन आणि विजेचा शॉक देऊन ही हत्या करण्यात आली होती. या तिहेरी हत्याकांड प्रकारांमुळे संपूर्ण हिंगोली जिल्हा हादरून गेला होता.


ही बातमी वाचा: