12th Fail: विधू विनोद चोप्रा यांचा 12 वी फेल (12th Fail) हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. पण हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर देखील या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील अभिनेता विक्रांत मेसी (Vikrant Massey) आणि मेधा शंकर यांचे अनेकांनी कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता हृतिक रोशननं 12 वी फेल या चित्रपटाचं कौतुक केलं. आता अभिनेत्री आलिया भट्टनं (Alia Bhatt) देखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.


आलियानं केलं तोंडभरुन कौतुक


आलियानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "मी पाहिलेल्या सर्वात सुंदर चित्रपटांपैकी एक हा चित्रपट आहे. खूप सुंदर!!!! विक्रांत मेसी तू खूप छान काम केलं आहे, मला आश्चर्य वाटले! मेधा शंकर मनोजच्या प्रवासामध्ये तू महत्वाची आहेस. सर्वकाही खूप खास, फ्रेश आणि हृदयस्पर्शी आहे. अनंत जोशी तुम्ही उत्कृष्ट आहात! आणि  विधू विनोद चोप्रा सर - हा चित्रपट खरोखरच हिट झाला! हा प्रेरणादायी चित्रपट आहे. चित्रपटाच्या संपूर्ण कलाकार आणि क्रूचे कौतुक" आलियानं शेअर केलेली ही पोस्ट विक्रांत मेसीनं रिपोस्ट केली आहे.




 '12वी फेल' चित्रपटाचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केले. या चित्रपटात विक्रांत मेसी आणि मेधा शंकर यांच्याशिवाय अनंत व्ही जोशी आणि अंशुमन पुष्कर यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली. 






हृतिकनं केली होती ही चूक


हृतिकनं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन 12 वी फेल या चित्रपटाचे कौतुक केले. हृतिकने 12 वी फेल या चित्रपटाचे कौतुक केले आहे पण नेटकऱ्यांनी एका कारणामुळे त्याला ट्रोल केलं आहे. हृतिक त्याच्या ट्वीटमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा उल्लेख केला आहे परंतु त्याने चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्याचा म्हणजे विक्रांत मॅसीचा कुठेही उल्लेख केलेला नाही. हृतिकच्या या चुकीमुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं. पण हृतिकनं केलेली ही चूक मात्र आलियानं टाळली.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Hrithik Roshan: '12वी फेल'चं हृतिकनं तोंडभरुन केलं कौतुक; पण 'या' कारणामुळे नेटकऱ्यांनी सुनावले खडे बोल!