Crime News :  अभ्यास करत नसल्याने आईने मुलावर रागावणे हे कुटुंबावर मोठा आघात करून गेले. आठवीत शिकणाऱ्या मुलाने अभ्यासासाठी आई रागावली म्हणून आयुष्य संपवले. पिंपरी-चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना घडली. जतीन सोमनाथ कुदळे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर मुलांच्या तणावाबाबत आणि त्यांच्या हळवेपणाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. 


जतीन इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. जतीन अभ्यास करत नसल्याने त्याची आई त्याला रागावली. याच रागातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. जतीनला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना 31 जानेवारीची असून एक फेब्रुवारी रोजी जतीनचा मृत्यू झाला.


आताची मुले हळवी झाली आहेत. त्यांच्या मनावर मोबाईल आणि टेलिव्हिजन चा खोलवर परिणाम झाल्याचं दिसत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आईने अभ्यास करण्यावरून रागावल्याने मुलाने आत्महत्या केली आहे. जतीन सोमनाथ कुदळे या आठवीत शिकणाऱ्या मुलाने हे टोकाचं पाऊल उचलले आहे. 31 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जतीनची आई त्याला अभ्यास करण्यावरून रागावली. मग, त्याची आई मुलीला ट्यूशनला सोडायला गेली होती. 


घरी कोणीच नसल्याचे पाहून चिडलेल्या जतीनने दरवाजा बंद करून गळफास घेतला. त्याने गळफास घेतला तेव्हा त्याच दरम्यान त्याचे वडील घरी आले. दरवाजा ठोठावला पण आतून प्रतिसाद येत नसल्याने पाठीमागील दरवाजाच्या फटीतून पाहिले. त्यांनी समोरील दृष्य पाहिल्यानंतर ते हादरून गेले. मुलाने गळफास घेतला असून त्याचे पाय जमिनीवर लागत असल्याचे दृष्य त्यांना दिसले. हादरलेल्या वडिलांनी तात्काळ दरवाजाच्या आतून हात घालून कडी उघडली. जतीनला तात्काळ महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही तासांच्या उपचारादरम्यान जतीनचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. 


खोड्या करतो म्हणून जन्मदात्या बापानेच मुलाला संपवलं


जन्मदात्या बापानेच आपल्या 14 वर्षीय मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सोलापुरात (Solapur Crime News)  उघडकीस आली आहे. विजय सिद्राम बट्टू असे मुलाची हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. 13 जानेवारी रोजी विशाल विजय बट्टू हा सकाळपासून घरी आला नसल्याची तक्रार आई, वडील आणि नातेवाईकांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली होती. त्याच दिवशी रात्री 11 च्या सुमारास सोलापुरातल्या तुळजापूर नाका (Tuljapur Naka)  परिसरात एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पोलिसांना आढळून आले.