नांदेड : खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून नांदेडमधील एका 42 वर्षाच्या व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिठ्ठी लिहून राहत्या घरात गळफास लावून व्यावसायिकाने आपले जीवन संपवले आहे. शहरातील अंबिका नगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


आत्महत्या केलेल्या 42 वर्षीय व्यक्तीचे नाव समीर येवतीकर असं आहे. या व्यावसायिकाने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये माजी नगरसेविकेचा पुत्र दीपक पाटील याच्या नावाचा उल्लेख केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी रात्री उशिरा दिपक पाटीलसह इतर दोन जणांवर भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडमध्ये या घटनेने खळबळ उडाली आहे. नांदेडमध्ये कायद्याचा कोणताही धाक राहिला नसून खासगी सावकारी मोठ्या प्रमाणात बोकाळल्याचं पुढे आलं आहे.


आत्महत्या केलेल्या समीर सुधाकर येवतीकर यांनी त्यांचा मित्र दीपक पाटीलकडून एक लाख रुपये घेतले होते. हे पैसे तीन ते चार वर्षांपूर्वी घेतले होते. त्याचं व्याज आणि इतर व्यवहार सुरू होता. पण सध्या दीपक पाटील यांच्याकडून मानसिक त्रास आणि जास्त पैशाची मागणी केली जात आहे असा उल्लेख त्यांनी चिठ्ठीमध्ये केला आहे.


याबाबत पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी फिर्याद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे आहे. पोस्टमार्टम आणि फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून आरोपीवर कारवाई करू असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. 


विमा प्रतिनिधीनेच घातला ठेवीदारांना करोडोंचा गंडा


विमा प्रतिनिधीनेचा ठेवीदारांना करोडोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधील मनमाड येथे घडला आहे. युनियन बँकेत हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे मनमाडमध्ये मोठी खळबळ उडाली असून ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत. 


याबाबत अधिक माहिती अशी की, युनियन बँक मनमाड शाखेतील विमा प्रतिनिधीने बँकेच्या मुदत ठेवीदारांनी ठेवी भरण्यासाठी, नूतनीकरणासाठी दिलेल्या रक्कमेचा परस्पर अपहार केल्याचा प्रकार समोर आल्याने बँकेच्या मुदत  ठेवीदारांचे चांगले दाबे दाणाणले आहेत. 


विमा प्रतिनिधीकडून करोडोंचा अपहार


संतप्त ठेवीदाराने बँकेसमोर एकच गर्दी केली. सुभाष देशमुख असे अपहार करणाऱ्या विमा प्रतिनिधीचे नाव असून त्याने शेकडो मुदत ठेवीदारांकडून बँकेच्या मुदत ठेवी करण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी बेअरर चेक घेतले व  स्वतःच्या नावावर परस्पर वटवून करोडो रुपयांचा अपहार केल्याचे ठेवीदारांचा आरोप आहे.


ही बातमी वाचा: