नागपूर: भाजप नेत्या सना खान (Sana Khan Case Update) प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. प्रमुख संशयित आरोपी अमित साहू याला जबलपूरमधून अटक करून नागपुरात आणलं. महत्त्वाचं म्हणजे अमित साहू हा सना खान यांचा पती असून त्याने सना खान हिची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. एवढंच नाही तर सना खान यांचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिलीय. असं असलं तरी सना खान यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. भारतीय जनता युवा मोर्च्याच्या पदाधिकारी सना खान 1 ऑगस्टला अमित शाहूला भेटायला जबलपूरला गेल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या.
जबलपूर मध्ये हिरण नदीमध्ये मेरेगाव जवळ अमित साहू आणि त्याचा मित्र राजेश सिंह यांनी सना खान यांचे मृतदेह नदीत फेकले होते. त्याच ठिकाणी सध्या जबलपूर पोलीस, नागपूर पोलीस आणि एसडीआरएफ ची टीम नदीमध्ये सना खान यांचा मृतदेह शोधत आहेत. पण अजून मृतदेह मिळालेले नाही. मात्र अनेक टीम्स या कामी लागल्यामुळे लवकरच सना खान यांचे मृतदेह नदीपात्रात मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Sana Khan Murder Case : नेमकं काय आहे प्रकरण?
मागील दहा दिवसांपासून भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान (Sana Khan) या बेपत्ता असून अद्याप त्यांच्याविषयी काही ठोस माहिती मिळाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट रोजी अमित साहूसोबत व्हिडीओ कॉलवर भांडण झालं. त्यानंतर सना त्याच रात्री तातडीने अखेरच्या बसने जबलपूरला गेली, मात्र ती पुन्हा परतलीच नाही. अमित साहू आणि सना खान यांची मैत्री होती. अमित साहू (Amit Sahu) हा जबलपूरमधील एक हॉटेल व्यावसायिक आहे. सना खान आणि अमित साहून या दोघांनी लग्न केलं असल्याचं समोर आलं आहे.
सना खान 2 ऑगस्टपासून बेपत्ता
सना खान या जबलपूरला पोहचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांनी नागपुरातील आपल्या कुटुंबीयांना फोन केला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या घरच्यांना सुखरुप पोहचल्याचं कळवलं होतं. 1 ऑगस्ट रोजी सना आणि अमित यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. सना यांनी दिलेली सोन्याची चेन अमितच्या गळ्यात दिसली नसल्यामुळे रागावलेल्या सना खान यांनी थेट जबलपूरचा मार्ग धरला होता, असं सांगण्यात येत आहे. पण, सनाने त्यांच्या घरच्यांना फोन करुन कळवल्यानंतर तिचा फोन बंद झाला.
ही बातमी वाचा: