पुणे :  पुणे शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच पुण्यातील वाहनांची संख्या देखील वाढली आहे. पुणेकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका होण्यासाठी हवेतून चालणाऱ्या बसचा वापर करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. यावेळी गडकरी यांनी  पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच कचरामुक्त पुणे करण्यासाठी उपाय सुचवले आहेत. पुण्याला मोकळा श्वास घेऊ द्या, असे देखील गडकरी यावेळी म्हणाले .


पुणेकरांचा प्रवास आजपासून सुसाट होणार आहे, म्हणजे वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. कारण चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं लोकार्पण आज झालंय. केंद्रीय मंत्री नितीत गडकरींच्या हस्ते चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं मोठ्या दिमाखात लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते 


 नितीन गडकरी म्हणाले, माझ्याकडे पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्कायबसची कल्पना आहे. माझी अजित  पवार आणि चंद्रकांत पाटील यांना विनंती आहे की एकदा याचे एकदा प्रेझेंटेशन पहावे. हवेतून चालणारी बस ही पुण्यातील वाहतूक कोंडीवर हा चांगला पर्याय आहे. पुण्याच्या विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.  यामधे दोन- तीन मजली उड्डाणपूल आहेत. वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होण्यासाठी  हवेतून चालणाऱ्या बस आपण येथे आणणार असून या बसमधून एका वेळेस 250 प्रवाशांन प्रवास करता येणार आहे.


चांदणी चौकातील पूल उभारण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर


नितीन गडकरी म्हणाले, अनेक अडचणींवर मात करून चांदणी चौकातील रस्त्याचं काम पूर्ण झाले आहे.  पुण्यातील रस्त्यांसाठी मेधा कुलकर्णी यांनी अनेक प्रयत्न केले आहेत.  अडचणींवर मात करून चांदणी चौकातील रस्त्याचं काम पूर्ण झाले.  चांदणी चौकातील पूल उभारण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.  मलेशिया, सिंगापूर इथल्या तंत्रज्ञानाचा वापर करून उड्डाण पूल करण्यात आला आहे. पुण्यात 40 हजार कोटींची कामे भविष्यात पूर्ण करणार आहे.


पुण्याला पेट्रोल, डिझेलपासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदूषण कमी होईल 


वाहनांची संख्या वाढल्याने अर्थात प्रदूषण वाढले आहे. पुण्याला पेट्रोल, डिझेलपासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. मला भारतातून पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करायचे आहे.  त्यासाठी इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करु नका तर कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा, ग्रीन हायड्रोजन तेच भविष्य असल्याचे  नितीन गडकरी यांनी सांगितले. 


हे ही वाचा :


Pune Air Bus Nitin Gadkari : ...तर लगेच पुण्यात हवेतील बस सुरु करु; नितीन गडकरी