Nagpur Hit And Run Murder Case : नागपूरमध्ये सुनेनेच 300 कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी आपल्या सासऱ्याच्या खुनाची सुपारी दिली आणि त्याला संपवलं. आपल्याच ड्रायव्हरला एक कोटी रुपये देऊन तिने सासऱ्याचा काटा काढल्याची घटना नागपूरमध्ये घडलीय. वरवर अपघात दिसणाऱ्या या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि हा गु्न्हा उघडकीस आला. 


पुरुषोत्तम पुट्टेवार, वय वर्ष 82, राहणार नागपूर असं मृत सासऱ्याचं नाव आहे. 22 मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार हे आपल्या घराबाहेर पडले. हातात एक पिशवी घेऊन ते रस्त्याच्या कडेनं चालत होते. तेवढ्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. एक भरधाव कार पुरुषोत्तम यांनी चिरडून निघून जाते. कारच्या धडकेत पुरुषोत्तम यांचा मृत्यू होतो. 


वरवर जरी हे घटना हिट अँड रन प्रकरण वाटू शकते. मात्र पोलिसांना एक संशय येतो आणि मर्डर मिस्ट्रीचा कट उघड होतो.


पुरुषोत्तम यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, मुलगी, एक मुलगा आणि सून आहे. मुलगा मनिष पुट्टेवार पेशानं डॉक्टर आहेत. सून सरकार नोकरी करते. कन्या योगिताचं लग्न झालंय. पुरुषोत्तम यांनी वडिलोपार्जित तब्बल 300 कोटींची प्रॉपर्टी आहे.


पुरुषोत्तम यांचा मृत्यू अपघातात झाला असं अनेकांना वाटलं. मात्र त्यांच्या चुलत भावाला संशय आला. लागलीच त्यांनी वरिष्ठ पोलिसांची भेट घेतली आणि तिथून या प्रकरणाला नवी दिशा आली.


या प्रकरणी प्रथम पोलिसांनी त्यांच्याच घरातील दोन कार चालकांना  ताब्यात घेतलं. कसून चौकशी केली असता दोघं बोलते झाले. नीरज  आणि सचिन अशी या कार चालकांची नावं. सचिनने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यावर हा कट कसा रचला, कुणाच्या सांगण्यावरून रचला हे सर्व सांगितलं.


पोलिसांनी पुरुषोत्तम यांच्या सुनबाई अर्चनाला तात्काळ ताब्यात घेतलं. पुरुषोत्तम यांच्या मृत्यूचा सगळा कट हा अर्चनाने रचला होता. कशासाठी तर सासऱ्यांच्या वडिलोपर्जित 300 कोटींच्या प्रॉप्रटीसाठी.


घरातील 2 चालकांना तिने तब्बल 1 कोटींचं प्रलोभन दिलं. एवढी मोटी रक्कम ऐकून दोघांचे डोळे फिरले आणि दोघांनी  मिळून आपल्याच मालकाचा काटा काढला.


पुरुषोत्तम पुट्टेवार हे आपली सगळी प्रॉपर्टी लेक योगिता आणि तिच्या मुलांच्या नावे करणार असल्याची कुणकुण अर्चनाला लागली. त्यानंतर अर्चनाच्या डोक्याचा पारा चढला. 300 कोटींच्या प्रॉपर्टीतून आपल्याला दमडही मिळणार नसल्याचं लक्षात येताच तिचा तिळपापड झाला. म्हणून अर्चनाने दोन कार चालकांना हाताशी घेऊन  सासऱ्यांचा जीव घेतला .अर्चनाला आता सासऱ्याचे पैसे मिळो न मिळो, तुरुंगाची हवा मात्र नक्की मिळणार आहे.


ही बातमी वाचा: