नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानची (IND vs PAK) मॅच सुरु असताना माजी क्रिकेटपटू कामरान अकमलनं (Kamran Akmal) एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पाकिस्तानचा माजी विकेटकीपर कामरान अकमलनं अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) शेवटची ओव्हर दिल्याबद्दल शेरेबाजी करत शीख धर्मासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कामरान अकमल एका टीव्हीवर लाईव्ह होता. हे भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या (Harbhajan Singh) लक्षात आल्यानंतर त्यानं कामरान अकमलला खडसावलं होतं. हरभजन सिंगनं खडसावल्यानंतर अकमलनं माफीनामा प्रसिद्ध केला आहे.
कामरान अकमलचा माफीनामा
कामरान अकमलनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करुन जाहीर माफी मागितली आहे. माझ्या अलीकडच्या काळातील टिप्पणीबद्दल खेद व्यक्त करतो आणि हरभजन सिंग आणि शीख समाजाची माफी मागत असल्याचं कामरान अकमल म्हणाला. माझे शब्द योग्य आणि सन्मानजनक नव्हते. मला जगभरातील शीख सुमदायाबद्दल आदर आहे, कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असं कामरान अकमलनं म्हटलं. मी मनापासून माफी मागतो, असं कामहान अकमलनं म्हटलं.
कामरान अकमलची पोस्ट
हरभजन सिंग काय म्हणाला?
कामरान अकमलच्या वादग्रस्त वक्तव्याच्या व्हिडीओवर ट्विट करत आणि त्याला टॅग करत हरभजन सिंगनं संताप व्यक्त केला होता. तुला लाज वाटली पाहिजे...कामरान अकमल...तोंड उघडण्यापूर्वी शीखांचा इतिहास जाणून घ्या...आम्ही शीखांनी तुमच्या आई बहिणींना घुसखोरांपासून वाचवले तेव्हा 12 वाजले होते. स्वतःची लाज वाटली पाहिजे, असं हरभजन सिंगनं म्हटलं होतं.
कामरान अकमल कडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
कामरान अकमलनं हरभजन सिंगनं खडसावल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत माफी मागितली आहे. जाहीर माफी मागत कामरान अकमलनं एक प्रकारे वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
भारताविरुद्ध पाकिस्तान सातव्यांदा पराभूत
भारत आणि पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपमध्ये 8 वेळा आमने सामने आले आहेत. भारतानं पाकिस्तानवर वर्चस्व मिळवलं आहे. भारतानं 8 पैकी सातवेळा पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. पाकिस्तानला केवळ एका मॅचमध्ये मिळाला आहे. भारतानं पाकिस्तानला 9 जूनला झालेल्या मॅचमध्ये 6 धावांनी पराभूत केलं.
संबंधित बातम्या :