Nagpur Cyber Froud: सायबर गुन्हेगारांचे (Cyber Froud) जाळे दिवसागणिक वाढत असून नवनवीन युक्त्याच्या माध्यमातून फसवणुकीचे (Froud) प्रकार घडत आहे. अशातच या सायबर गुन्हेगारांचे धाडस आता चक्क पोलिसांच्या नावे  बनावट फेसबुक अकाउंट उघडून फसवणूक (Nagpur Crime) करण्यापर्यंत गेले आहे. असाच एक खळबळजनक प्रकार चक्क नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल (Dr Ravinder Singal) यांच्या बाबतीत घडला आहे. सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या नावाचेदेखील बनावट फेसबुक खाते तयार केले आहे. सोबतच या खात्यावरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आल्याचे देखील समोर आले आहे.


चक्क पोलीस आयुक्तांचा नावे बनावट फेसबुक अकाऊंट 


मोटिव्हेशनल स्पीकर, टेक्नोसॅव्ही अधिकारी आणि तितकेच सोशल माध्यमांवर सक्रिय असणारे अधिकारी म्हणून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांची एक खास ओळख आहे. फेब्रुवारीच्या महिन्यात त्यांनी नागपूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शहर विविध हत्या आणि अपराधांच्या घटनांनी हादरले. त्यामुळे पदभार स्वीकारताच शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे एक आव्हान त्यांच्या पुढे आहे. यासाठी स्व:ता डॉ. सिंगल हे रस्त्यावर उतरून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात व्यस्त आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोनच दिवसांत सायबर गुन्हेगाराने त्यांचे बनावट फेसबुक खाते तयार केले. त्यानंतर शहरातील अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट देखील पाठविण्यात आल्या आहेत.


यापूर्वीचे देखील घडले असेच प्रकार 


यापूर्वीचे देखील माजी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे असेच फेक अकाउंट उघडून फसवणूक करण्यात आली होती. त्यानंतर  त्यातील आरोपींना अटक करण्यात आली होती.  तर असाच एक प्रकार माजी पोलीस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय यांच्या सोबत देखील घडला होता. उत्तर प्रदेशच्या आझमगड येथील रहिवासी असलेल्या संतोष कुमार या संशयित आरोपीने माजी पोलीस महासंचालक उपाध्याय यांच्या नावाने फेसबुकवर अकाऊंट तयार करून अनेकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. या पूर्वी झालेले प्रकार लक्षात घेता पोलीस यंत्रणा सतर्क राहून अशा सायबर गुन्हेगारांचा तपास करत आहे. सध्या पोलीस डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार करणाऱ्या  सायबर गुन्हेगारांचा शोध घेत असून कुणीही अशा भूलथापा अथवा बनावट फेसबुक खात्यांवर पडताळणी केल्या शिवाय विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने कण्यात आले आहे. 


थेट पोलीस आयुक्तालयातच फ्री स्टाईल हाणामारी


छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयातच दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना बघायला मिळाली. दरम्यान, हा सगळा प्रकार पोलिसांसमोरच झाल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली. या घटनेमुळे काही काळ पोलीस आयुक्त कार्यालयात गोंधळ निर्माण झाला होता. नागराज गायकवाड हे आपल्या शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते. तर, त्यांच्यासोबत ज्याचा वाद झाला ते व्यक्तीचारित्र्य प्रमाणपत्र काढण्यासाठी आले होते. दरम्यान, दोघांमध्ये वाद झाला आणि पुढे थेट हाणामारी सुरु झाली. पोलीसांनी मध्यस्थी करत हा प्रकार मिटवला. तर, विद्यापीठातील जुन्या वादावरून हा वाद झाला असल्याची माहिती समोर आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या