नागपूर : चोर समजून चालत्या ट्रेनमध्ये चार प्रवाशांनी तरुणाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे.  शशांक रामसिंग राज असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद ते दिल्ली येथे जाणाऱ्या दक्षिण एक्स्प्रेसमध्ये (Dakshin Express) चोर समजून चार प्रवाशांनी शशांक रामसिंग राज या तरुणाला चालत्या ट्रेनमध्ये लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दक्षिण एक्स्प्रेस ही सेवाग्रामजवळ असताना जनरल बोगीत आरोपींनी तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. 


चार जण ताब्यात 


या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. दक्षिण एक्स्प्रेस ट्रेन नागपूर स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर जखमीची वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 


दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरले


दरम्यान, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूरात दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना घडली. यात पोटच्या मुलाने आई -वडिलांची हत्या केली आहे. नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्यातर्गत खसाळा कॅम्पसमध्ये ही घटना घडली आहे. लीलाधर डाखोडे आणि अरुणा डाखोडे अशी मृतांची नावे असून आरोपी हा त्याचाच मुलगा उत्कर्ष डाखोडे आहे. मृतक लीलाधर हे कोराडी थर्मल प्लांटमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करतात. तर अरुणा विनोबा भावे नगर येथील एका खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या. आरोपी उत्कर्ष हा 6 वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. वारंवार अपयश आल्याने उत्कर्षच्या पालकांनी अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला देत होते. पण उत्कर्ष अभियांत्रिकी पूर्ण करण्याच्या त्याच्या आग्रहावर ठाम होता. मात्र आरोपी उत्कर्षला एमडीचे व्यसन होते आणि या व्यसनामुळे त्याला अभ्यास करता येत नव्हता. आई-वडिलांच्या सततच्या समजुतीमुळे तो चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या करण्याचा घातक प्लॅन तयार केला. आधी आई अरुणाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Pune Crime News: आपल्या मुलीची एका मुलासोबत मैत्री, फोनवरती बोलते, संतापलेल्या वडील अन् भावाने तरुणाला क्रूरपणे संपवलं; पुण्यातील धक्कादायक घटना


Nanded News : इराणला गेलेला नांदडेचा इंजिनिअर बेपत्ता, 24 दिवसांपासून संपर्क नाही, पत्नी-कुटुंबाचा जीव टांगणीला