Nanded News : वसमत येथील कारखाना रोड भागातील रहिवासी असणारे अभियंता योगेश उत्तमराव पांचाळ हे नांदेड मध्ये पत्नीसह राहतात. काही दिवसांपूर्वीच श्रीयोग एक्सपोर्ट नावाने नवीन कंपनीची नोंदणी केली होती. योगेश पांचाळ इराण येथील सादीक यांची कंपनी पाहण्यासाठी 5 डिसेंबर रोजी मुंबईयेथून इराण येथे गेले. त्या ठिकाणी ते तेहराण मधील बहारेस्तान हेरिटेज या हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांचा व्हिडीओ कॉलवरून सादीक यांच्याशी संपर्कही झाला होता. तसेच त्यांनी नांदेड येथे पत्नी आणि लहान मुलाशी संपर्क केला. मात्र त्यानंतर 7 डिसेंबरपासून त्यांचा संपर्कच झाला नाही. दरम्यान, गेल्या 24 दिवसांपासून त्यांचा संपर्क तुटला असल्याचे पुढे आले आहे.

Continues below advertisement


 पत्नीकडून पत्रव्यवहार, राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी


दरम्यान, योगेश यांचा परतीचा प्रवास दि.11  डिसेंबर रोजी असल्यामुळे त्यांनी विमानतळावर संपर्क साधला असता योगेश विमानात बसलेच नसल्याचे सांगण्यात आले. 24 दिवसापासून संपर्क होत नसल्याने कुटुंबीय चिंतेत सापडले आहेत. योगेश यांच्या पत्नी पांचाळ यांनी या संदर्भात सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच नांदेड पोलीस अधीक्षक व खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरू केला आहे. सरकारने माझ्या पत्नीचा शोध लावावा,  अशी विनंती योगास पांचाळ यांच्या पत्नी श्रद्धा पांचाळ यांनी केली आहे.


जिल्हा पोलिसांची भूमिका यामध्ये लिमिटेड असते, सेंट्रल लेव्हलवर सीबीआय एजन्सी आहे आणि स्टेट लेव्हलवर सीआयडी ही कॉर्डिनेट करते. सीबीआयला यावर आमचा पूर्ण पत्र व्यवहार झाला असून पाठपुरावा सुरू असल्याचे मत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी व्यक्त केले आहे.


हे ही वाचा